ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:10 PM2022-07-21T13:10:48+5:302022-07-21T13:20:06+5:30

Prajaktta Mali: प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Maharashtrachi hasya jatra fame prajaktta mali share a post Netizens' give funny comments on that | ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून कारकीर्दीची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. प्राजक्ताची रानबाजार वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. तसेच तिचा 'वाय' चित्रपटही काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. सध्या प्राजक्ता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी प्राजक्ता एक आहे. सतत ती चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. अलीकडेच प्राजक्ताने स्वत: वरील काही मीम्स शेअर केले होते. ते चांगलंच व्हायरल झाले होते.

 प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे साडीतले फोटो शेअर केले आहेत. ज्याचे कॅप्शन तिने विनोदी दिलं आहे. अभिनेत्रीने आजच्या ठळक बातम्या- माळी टाईम्स, आजचं caption परवाच्या comments मधून ढापलेलं आहे. म्हणून बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव- मथळा मराठीत आहे. असा भन्नाट कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. आजची ठळक बातमी खूपच आवडली, पेपर सोबत ची "पुरवणी" कुठंय.... #प्राजु, छानच सुंदर  प्राजक्ताची माहीती हवी असल्यास माळी टाईम्स अवश्य वाचा, रद्दीचा भाव गगनाला भिडला, ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली. अशा एक पेक्षा एक कमेंट चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. प्राजक्ताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. 


 

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame prajaktta mali share a post Netizens' give funny comments on that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.