'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By कोमल खांबे | Updated: October 13, 2025 14:02 IST2025-10-13T14:02:30+5:302025-10-13T14:02:45+5:30
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश मांजरेकरांच्या या सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा मांडण्यात आला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकरांच्या या सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांना हसवणारा आणि प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता पृथ्विक प्रताप 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. पृथ्विकने त्याच्या सोशल मीडियावरुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला पृथ्विक प्रतापने हजेरी लावली होती. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनेत्याचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडके, पृथ्विक प्रताप, महेश मांजरेकर, बालकलाकार भार्गव जगताप आणि त्रिशा ठोसर, सायली शिंदे, मंगेश देसाई अशी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे.