'धकधक गर्ल' माधुरीच्या सासू सासऱ्यांना पाहिलंत का? कुटुंबासह घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:18 PM2024-01-02T16:18:01+5:302024-01-02T16:19:37+5:30

माधुरीचे सासू सासरे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत

Madhuri Dixit took blessings at Siddhivinayak Temple with family her mother in law and father in law were also seen | 'धकधक गर्ल' माधुरीच्या सासू सासऱ्यांना पाहिलंत का? कुटुंबासह घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

'धकधक गर्ल' माधुरीच्या सासू सासऱ्यांना पाहिलंत का? कुटुंबासह घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकतंच कुटुंबासह मुंबईचं आराध्य दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. माधुरी मंदिरात आली हे कळताच तिची एक झलक पाहण्यासाठी पापाराझी आणि चाहत्यांची गर्दी जमली. यावेळी तिचे पती डॉ श्रीराम नेने (Dr Shriram Nene) तिच्यासोबत उभे होते. शिवाय माधुरीची दोन्ही मुलंही दिसली. मात्र पहिल्यांदाच माधुरीचे सासू सासरेही पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित सध्या सतत चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच माधुरी तिच्या कुटुंबासह अमेरिकेतून पुन्हा भारतात स्थायिक झाली आहे. भारतात आल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीतही कमबॅक केलं आहे. शिवाय तिचे पती श्रीराम नेने यांच्यासोबत तिने युट्यूब चॅनलही सुरु केले आहे. डॉ नेनेही आजकाल लाईमलाईटमध्ये असतात. आज माधुरी कुटुंबासह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचली. यावेळी तिच्या सासू सासऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. डॉ नेनेंचे आई वडीलही याआधी कधी फारसे कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. सोबतच अरिन आणि रायन ही दोन मुलंही दिसत आहेत. सध्या माधुरीचा हा फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

डॉ श्रीराम नेने यांचा जन्म लंडनमध्ये झाला. तर त्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं. ते अमेरिकेत कार्डिव्हॅस्क्युलकर सर्जन होते. नेने यांचे आईवडीलही अमेरिकेतच राहत असत. त्यांच्या वडिलांचं नाव माधव नेने आहे. श्रीराम यांना एक बहीणही आहे जिचं नाव सीमा नेने आहे. 17 ऑक्टोबर 1999 साली माधुरी डॉ नेनेंच्या घरची सून झाली. यानंतर ती देखील अमेरिकेतच स्थायिक झाली.  काही वर्षांपूर्वीच दोघंही भारतात परतले आहेत. दोघांनी आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून त्यांचा एक सिनेमाही रिलीज होत आहे. 

Web Title: Madhuri Dixit took blessings at Siddhivinayak Temple with family her mother in law and father in law were also seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.