मधुरा वेलणकर लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 08:00 IST2018-11-06T08:00:00+5:302018-11-06T08:00:00+5:30

अभिनेत्री मधुरा वेलणकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक निर्णय या मराठी सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Madhura Velvarna soon meet the receptionist | मधुरा वेलणकर लवकरच रसिकांच्या भेटीला

मधुरा वेलणकर लवकरच रसिकांच्या भेटीला

ठळक मुद्दे एक निर्णय चित्रपटात मधुरा दिसणार मुख्य भूमिकेत

अभिनेत्री मधुरा वेलणकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक निर्णय या मराठी सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून अभिनेते श्रीरंग देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करतायेत. श्रीरंग आपल्याला मी शिवाजी राजे भोसले बोलतोय सिनेमात दिसले होते. श्रीरंग यांनी फक्त या सिनेमाचे दिग्दर्शनच केले नाही तर लेखन आणि निर्मितीची जबाबदारी सुद्धा संभाळली आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असणार आहे. मधुरा तिच्या आगामी सिनेमासाठी खूपच उत्सुक आहे. मधुराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. एक निर्णय या सिनेमाची निर्मिती स्वरांग प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे. हा सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही वेळ वाट  पाहावी लागणार आहे कारण हा सिनेमा पुढच्या वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

मधुरा वेलणकर तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात आली. तिचे वडील प्रदीप वेलणकर हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय क्षेत्र म्हटले की, तुम्हाला चित्रीकरणासाठी अनेक तास द्यावे लागतात. प्रदीप वेलणकर यांचे शेड्युल तर नेहमीच व्यग्र असायचे आणि हे सगळे मधुराने लहानपणापासून पाहिले आहे. पण तरीही तिला अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्राकडे वळली. तिचे आणि तिच्या वडिलांचे ट्युनिंग खूपच चांगले आहे. ती नेहमीच तिच्या वडिलांसोबत विविध विषयांवर गप्पा मारत असते. त्या दोघांनाही शास्त्रीय संगीत, खेळ याची खूप आवड आहे

Web Title: Madhura Velvarna soon meet the receptionist