‘मेड इन महाराष्ट्र’चे म्युझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 20:13 IST2016-04-11T03:13:04+5:302016-04-10T20:13:04+5:30

मराठी सिनेमांची प्रेक्षकसंख्या जशी वाढत आहे तसा निर्माते-दिग्दर्शकांचा उत्साहदेखील उभारी घेत आहे. मोठ्या धुमधडाक्यात पोस्टरपासून ते सक्सेस पार्टीपर्यंत सगळेच ...

'Made in Maharashtra' music launch | ‘मेड इन महाराष्ट्र’चे म्युझिक लाँच

‘मेड इन महाराष्ट्र’चे म्युझिक लाँच

ाठी सिनेमांची प्रेक्षकसंख्या जशी वाढत आहे तसा निर्माते-दिग्दर्शकांचा उत्साहदेखील उभारी घेत आहे. मोठ्या धुमधडाक्यात पोस्टरपासून ते सक्सेस पार्टीपर्यंत सगळेच कार्यक्रम साजरे केले जातात.

नुकतेच मुंबईमध्ये ‘मेड इन महाराष्ट्र’ या चित्रपटाचे संगीत अनावरण (म्युझिक लाँच) करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे कलाकार भाऊ कदम, अरुण नलावडे, जीतू गोस्वामी, प्रवण गर्जे, प्रिया गम्रे, शितल गायकवाड आदी उपस्थित होते. 

नितेश पवार दिग्दर्शित ‘मेड इन महाराष्ट्र’ चित्रपटाचे संगीत अरुण-विलास आणि सचिन-सुभाष यांनी दिले आहे. एकुण पाच गाणी या चित्रपटात असून त्यांना स्वप्निल बांदोडकर, बेला शिंदे, सचिन मिलाप, वैशाली माडे, नेहा राजपालर, हृषिकेश रानडे, अभिजित कोसंबी या अशा उत्कुष्ट गायकांचे स्वर लाभले आहेत.

मराठी चित्रपटांचे संगीत नेहमीच श्रवणीय आणि भावपूर्ण राहिलेले आहे. ‘मेड इन महाराष्ट्र’च्या म्युझिक अल्बमकडून अशीच अपेक्षा करने वावग ठरू नये. अद्याप प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आलेली नाही.

Web Title: 'Made in Maharashtra' music launch