हे पाहा, कोणावर चिडली आहे संस्कृती बालगुडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 16:28 IST2017-02-07T10:58:12+5:302017-02-07T16:28:12+5:30

सध्या कलाकारांचे सोशल अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाणे वाढत चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अक्षय्या देवधर हिचे ...

Look, who is angry with the culture Balagide | हे पाहा, कोणावर चिडली आहे संस्कृती बालगुडे

हे पाहा, कोणावर चिडली आहे संस्कृती बालगुडे

्या कलाकारांचे सोशल अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाणे वाढत चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अक्षय्या देवधर हिचे अकाऊंटदेखील हॅक करण्यात आले होते. या अभिनेत्रीच्या पाठोपाठ आता, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे देखील इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. यामुळे संस्कृती ही खूपच चिडलेली दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
           
        तिच्या या अकाऊंट हॅकविषयी संस्कृती लोकमत सीएनएक्सला सांगते, हे असे अकाऊंट हॅक करणे ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्यांना मजा वाटते. मात्र सोशलमीडिया हे लोकांपर्यत पोहचण्याचे सोईस्कर माध्यम आहे म्हणून आम्ही कलाकार सगळे कामाच्या व्यापातून वेळ काढून इतक्या मेहनतीने  प्रत्येकजण आपले सोशल अकाऊंट मेन्टेंन करत असतो. त्यासाठी अतोनात मेहनत करत असतो. म्हणूनच ज्या कोणी व्यक्तीने माझे अकाऊंट हॅक केले असेल त्या व्यक्तीला मी असे सरळ साध्या पध्दतीने सोडणार नाही. त्या व्यक्तीची मी कायदेशीर पध्दतीने कंप्लेट करणार आहे. सध्या मी ती प्रोसेसदेखील पूर्ण करत आहे. तसेच मी सर्वाना अलर्ट केले आहे. मी आताच पाउले उचलेले नाहीतर हे असेच सुरू राहील. मात्र हा सर्व प्रकार पाहून मी स्वत:देखील खूपच भावनिक झाले आहे. कारण मी इतके फोटो अपलोड केले होते. त्या व्यक्तीने केवळ सोशलमीडियावर चौदा ते पंधराच फोटो ठेवले आहेत. हे सर्व पाहून मला खूपच रडू आले.
           
       संस्कृतीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीला आतापर्यत एक से एक चित्रपट दिले आहेत. तिचा आता महेश मांजरेकर निर्मित एफयू हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार. 
          
               
    





Web Title: Look, who is angry with the culture Balagide