लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर-2017: रिंकूने धरला जितेंन्द्रसोबत ठेका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 21:41 IST2017-04-11T15:31:54+5:302017-04-11T21:41:59+5:30
आर्ची या नावाने घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू हिला सनेमा क्षेत्रातील महिला कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर-2017 या पुरस्काराने ...
.jpg)
लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर-2017: रिंकूने धरला जितेंन्द्रसोबत ठेका...
आ ्ची या नावाने घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू हिला सनेमा क्षेत्रातील महिला कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर-2017 या पुरस्काराने गौरविण्यात आले.ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जितेन्द्र व रिंकू यांनी ‘ताकी ताकी ताकी रे...’ या गाण्यावर असा काही ठेका धरला की, सगळेच नाचू लागले.
ज्या क्षेत्रात गॉडफादर असणं हे अगदी महत्त्वाचं समजलं जातं अशा सिनेक्षेत्रात, सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, सोलापूरमधील अकलूजमध्ये राहणारी एक सर्वसामान्य मुलगी आर्ची बनून रुपेरी पडद्यावर अवतरली. बिनधास्त आणि डॅशिंग अंदाज, आपल्या प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आर्ची तिनं अशी काय साकारली की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचीच चर्चा झाली. ती आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु. ‘सैराट’ या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेने मराठीच नाहीतर सर्व सिनेरसिकांना अक्षरक्ष: वेड लावलं. आपल्या रिअल वयापेक्षाही जास्त वय असलेली भूमिका तिने तितक्याच खुबीने साकारली. तिचं वागणं, बोलणं, स्क्रीनवरील वावर, डोळ्यांमधील चमक यामुळे तिने साकारलेली आर्ची रसिकांच्या मनामनात भिनली. रसिक जणू काही आर्चीच्या प्रेमात झिंगाट झालेत. तिची हीच जादू पाहून तिला मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. सध्याच्या घडीला आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ओठावर असलेलं नाव. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मराठीच नाही तर इतर भाषांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सिनेमा क्षेत्रातील महिला कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर-2017 या पुरस्काराने रिंकू राजगुरु हिला गौरवण्यात आले.