"आपण एकत्र राहुया...",रेणुका शहाणेसमोर निर्मात्याने ठेवला होता विचित्र प्रस्ताव, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:16 IST2025-11-10T12:15:46+5:302025-11-10T12:16:24+5:30
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना सांगितले की, एका निर्मात्याने तिच्यासमोर एक विचित्र प्रस्ताव कसा ठेवला होता आणि तो ऐकून त्या आणि त्यांची आई चकित झाल्या होत्या.

"आपण एकत्र राहुया...",रेणुका शहाणेसमोर निर्मात्याने ठेवला होता विचित्र प्रस्ताव, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
'हम आपके हैं कौन' फेम अभिनेत्री रेणुका शहाणेने अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना सांगितले की, एका निर्मात्याने तिच्यासमोर एक विचित्र प्रस्ताव कसा ठेवला होता आणि तो ऐकून त्या आणि त्यांची आई चकित झाल्या होत्या.
रेणुका शहाणेने 'झूम'शी बोलताना सांगितले की, तो निर्माता तिला एका प्रोजेक्टसाठी साइन करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला होता. त्या घटनेची आठवण करून अभिनेत्री म्हणाली, ''खूप वर्षांपूर्वी एक निर्माता मला भेटायला माझ्या घरी आला होता. त्याने मला थेट प्रस्तावच दिला की, 'मी विवाहित आहे, पण मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, तुला मी दर महिन्याला स्टायपेंड देखील देईन, सोबतच तुला साडी कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर देखील बनवतो.' हे ऐकून माझी आई आणि मी हैराण झालो होतो. मला वाटते की त्यानंतर काय होते ते अधिक महत्त्वाचे आहे. त्या निर्मात्याचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला, पण त्याने तोच प्रस्ताव दुसऱ्या अभिनेत्रीसमोरही ठेवला होता.''
रेणुका म्हणाली...
रेणुका म्हणाली की, ''चित्रपटसृष्टीत काम करणे अनेकांसाठी सहज नसते, कारण विरोधात बोलणाऱ्यांसाठी शक्तिशाली लोक जाणीवपूर्वक अडचणी वाढवतात. अशा घटनांचा महिलांवर काय परिणाम होतो.'' तिच्या मते, ''एकतर तुम्हाला बाहेर काढले जाते किंवा मग सगळे एकत्र येऊन तुम्हाला अजून त्रास देतात. जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत. हा एक संपूर्ण क्लब आहे जो एकत्र येतो आणि पीडितेला अधिक त्रस्त करण्याचा प्रयत्न करतो.''