लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबीयांचा हा जुना फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, वा.. क्या बात है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 16:23 IST2021-01-25T16:20:29+5:302021-01-25T16:23:01+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया, मुलगी स्वानंदी आणि मुलगा अभिनय यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

laxmikant berde wife priya berde son abhinay daughter swanandi picture | लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबीयांचा हा जुना फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, वा.. क्या बात है

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबीयांचा हा जुना फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, वा.. क्या बात है

ठळक मुद्देअभिनय, स्वानंदी या फोटोत खूपच गोंडस दिसत आहेत. अभिनयच्या मुंजीतील हा फोटो असावा असा अंदाज त्यांचे फॅन्स सोशल मीडियावर लावत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया, मुलगी स्वानंदी आणि मुलगा अभिनय यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिनय, स्वानंदी या फोटोत खूपच गोंडस दिसत आहेत. अभिनयच्या मुंजीतील हा फोटो असावा असा अंदाज त्यांचे फॅन्स सोशल मीडियावर लावत आहेत. या फोटोत अभिनयने धोतर नेसलेले असून स्वानंदी त्याच्या बाजूला उभी आहे तर प्रिया बेर्डे यांनी नऊवारी साडी नेसली आहे. हा फोटो काढला त्यावेळी स्वानंदी आणि अभिनय खूपच छोटे होते. ते खूपच छान दिसत असल्याचे त्यांचे फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. या अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आदर्श मानतात. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिलेली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे. अभिनय आणि स्वानंदीने देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा अभिनय रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो अशी ही आशिकी चित्रपटात झळकला तसेच रवी जाधव दिग्दर्शित रंपाट चित्रपटात त्याने काम केले. 

स्वानंदी बेर्डे 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

Web Title: laxmikant berde wife priya berde son abhinay daughter swanandi picture