'चौर्य' चित्रपट करण्यासाठी जमीन विकावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 16:56 IST2016-08-19T11:26:17+5:302016-08-19T16:56:17+5:30

चौर्य हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविष़यी लोकमत सीएनएक्सशी बोलताना दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, चौर्य करण्यापूर्वी ...

Land was to be developed for the film 'Chaura' | 'चौर्य' चित्रपट करण्यासाठी जमीन विकावी लागली

'चौर्य' चित्रपट करण्यासाठी जमीन विकावी लागली

र्य हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविष़यी लोकमत सीएनएक्सशी बोलताना दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, चौर्य करण्यापूर्वी  माझा एक चित्रपट आॅडिशन होऊन बंद पडला. तर एका चित्रपटाचे तीन दिवस चित्रीकरण केलं होतं. त्या चित्रपटाचे देखील चित्रिकरण थांबले. अशा पद्धतीने  काही ना काही कारणानं माझे तीन चित्रपट बंद पडले होते. या सगळ्यात माझी मेहनत वाया गेली. याचे खूप वाईट वाटले होते. त्यामुळे डोक्यात एकच विचार केली की, आपल्याला हवं ते करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च काहीतरी करावं. या विचाराने चित्रपट करण्यासाठी जमीन विकणं हाच एक पर्याय माझ्यासाठी उपलब्ध होता. त्यामुळे जमीन विकून मी स्वत:चा चित्रपट तयार केला. आणि आज तो प्रदर्शित झाला असल्याने याचा मला खूप आनंद होत आहे. पण जमीन विकल्याचे दु:ख नाही कारण एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल हे उभं करावं लागतं. तसेच हा चित्रपट करण्यासाठी  नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांची देखील मदत मिळाली आहे.  माझ्या या मित्रांनी चित्रपटाची निर्माती केली असून राजन आमले यांनी सहनिर्मिती केली आहे.

Web Title: Land was to be developed for the film 'Chaura'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.