म्हणून ललित प्रभाकरच्या डोळ्यात अश्रू आले दाटून…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 07:15 IST2018-09-14T14:14:26+5:302018-09-16T07:15:00+5:30

नुकताच ललित प्रभाकरने त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मिळालेल्या शुभेच्छा आणि फोन कॉलमुळे ललित भारावून गेला.

Lalit Prabhakar Got Emotion And Had Tears In His Eyes | म्हणून ललित प्रभाकरच्या डोळ्यात अश्रू आले दाटून…

म्हणून ललित प्रभाकरच्या डोळ्यात अश्रू आले दाटून…

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. नुकताच ललितने त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मिळालेल्या शुभेच्छा आणि फोन कॉलमुळे ललित भारावून गेला. आपल्या हितचिंतकांचे आभार व्यक्त करण्यासाठी ललितने सोशल मीडियाचा आधार घेतला. सोशल मीडियावर आभाराची पोस्ट टाकताना ललित भावुक झाला होता. त्याने एक फोटो आणि आभाराची एक पोस्ट शेअर केली. “वाढदिवसाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या भरभरुन आलेल्या शुभेच्छा पाहून भारावलो आहे.  या शुभेच्छा देऊन जे माझ्यावरील प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या शुभेच्छांमुळे भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ मिळेल” अशा शब्दांत ललितने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्याला अश्रू अनावर झाले होते. तो फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या. मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे ललित प्रभाकर बदललेला लूक, रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइलमुळेही ललित सा-यांचे लक्षवेधून घेत असतो.

Web Title: Lalit Prabhakar Got Emotion And Had Tears In His Eyes