ललित प्रभाकरसह रोमँटिक झाली गिरिजा प्रभू, "ओल्या सांजवेळी" गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ
By कोमल खांबे | Updated: October 16, 2025 16:06 IST2025-10-16T16:05:44+5:302025-10-16T16:06:08+5:30
'प्रेमाची गोष्ट'मधील ओल्या सांजवेळी हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्याचं नवं व्हर्जन 'प्रेमाची गोष्ट २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

ललित प्रभाकरसह रोमँटिक झाली गिरिजा प्रभू, "ओल्या सांजवेळी" गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ
'प्रेमाची गोष्ट' या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट २' या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमातील गाण्यांना प्रचंड प्रेम मिळत आहे. 'प्रेमाची गोष्ट'मधील ओल्या सांजवेळी हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्याचं नवं व्हर्जन 'प्रेमाची गोष्ट २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'प्रेमाची गोष्ट २'मधील ओल्या सांजवेळी या गाण्यावर अभिनेता ललित प्रभाकर आणि गिरिजा प्रभू यांनी डान्स केला आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ललित आणि गिरिजाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. गिरिजाने ललितसोबत ओल्या सांजवेळी गाण्याच्या हुकस्टेप्स केल्या आहेत. ललित आणि गिरिजाचा हा रोमँटिक डान्स चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. या सिनेमात ललित, ऋचा आणि रिधिमासोबत भाऊ कदम, स्वप्नील जोशीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.