​‘लाल इश्क’चा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 19:51 IST2016-04-23T14:21:57+5:302016-04-23T19:51:57+5:30

या चित्रपटाचे पहिले ट्रेलर यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे. 

Laal Ishq's Trailer Launch | ​‘लाल इश्क’चा ट्रेलर लाँच

​‘लाल इश्क’चा ट्रेलर लाँच

ष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि भव्यदिव्य हिंदी फिल्म्ससाठी प्रसिद्ध संजय लीला भंसाळी यांच्या निर्मितीतील  पहिलीवहिला चित्रपट म्हणजे ‘लाल इश्क’. भंसाळी मराठीत पदर्पण करणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. 

मराठीतील ‘चॉकलेट बॉय’ स्वप्निल जोशी यामध्ये काम करणार म्हटल्यावर तर हा चित्रपट ‘हॉट टॉपिक’च बनला. आता या चित्रपटाचे पहिले ट्रेलर यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे. 

ट्रेलरवरून हा चित्रपट ‘मर्डर मिस्ट्री’ वाटतोय. स्वप्निलचा एकदम हटके रोल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘गुपीत आहे साक्षीला’ हे उपशीर्षक ट्रेलर पाहून अतिशय समर्पक वाटते. 

आता भंसाळीचा चित्रपट म्हटल्यावर ‘गॅ्रंडनेस’ आणि ‘ग्लॅमर’ तर येणारच. चित्रपटातील सीन्स आणि एकंदर सादरीकरणावर भंसाळींचा प्रभाव साफ दिसून येतो. ‘मितवा’ फेम दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी ‘लाल इश्क’ डिरेक्ट केला आहे.



स्वप्निल बरोबरच बॉलिवूड बाला अंजान सुखानी या चित्रपटात झळकणार आहे. याव्यतिरिक्त जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे आणि कमलेश सावंत हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भंसाळींच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाचे संगीत काही तरी हटके असणार यात काही शंका नाही.

 

Web Title: Laal Ishq's Trailer Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.