क्षिती जोगची हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली - "असाच नेहमी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 17:01 IST2024-03-21T17:00:41+5:302024-03-21T17:01:51+5:30

Hemant Dhome : आज हेमंत ढोमेचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने क्षितीने खास पोस्ट शेअर केली आहे.

Kshiti Jog's special post on Hemant Dhome's birthday, says - "Always like this..." | क्षिती जोगची हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली - "असाच नेहमी..."

क्षिती जोगची हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली - "असाच नेहमी..."

दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग (Kshiti Jog) ही सुपरहिट मराठमोळी जोडी आहे. 'झिम्मा' आणि 'झिम्मा २' च्या यशानंतर त्यांचा फॅन फॉलोव्हिं वाढला आहे. खऱ्या आयुष्यातही हे कपल खूपच एंटरटेनिंग आहे. मराठी प्रेक्षकांची तर ही एकदमच लाडकी जोडी बनली आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. दरम्यान आज हेमंत ढोमेचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने क्षितीने खास पोस्ट शेअर केली आहे.

क्षिती जोगने हेमंत ढोमेसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे पार्टनर. असाच नेहमी स्टोरी सांगत जा. अशीच स्वप्न पाहत राहा. खूप मेहनत घे. असाच हसत राहा आणि विश्वास ठेव. आय लव्ह यू. क्षितीने हॅशटॅगमध्ये आनंदी पाटील. बर्थडे पाटील आणि माय पाटील हे लिहिले आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहेत. चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

अशी आहे लव्हस्टोरी
नाटकाच्या रिहर्सलच्या निमित्ताने क्षिती व हेमंत यांची पहिली भेट झाली होती. नाटकाच्या निमित्ताने झालेल्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर लग्नात. या लव्हस्टोरीत कोणीच कोणाला प्रपोज केले नाही. एकमेकांच्या मनातल्या भावना एकमेकांना कळल्या आणि ही प्रेमकथा आपोआप बहरत गेली. प्रेमाची जाणीव झाल्याने दोघांनी आपआपल्या घरी कल्पना दिली. पण ‘चट मंगनी, पट ब्याह’ या अटीवर दोघांच्याही कुटुंबीयांनी या नात्याला परवानगी दिली. मग काय, क्षिती व हेमंतचा लगेच साखरपुडा झाली आणि वर्षभराच्या आत लग्न झालं.

Web Title: Kshiti Jog's special post on Hemant Dhome's birthday, says - "Always like this..."