क्षिती जोगची भागमभाग,‘नॉक नॉक सेलिब्रिटी’नाटक, मालिका आणि चित्रपटामुळे कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:22 IST2019-04-17T14:20:17+5:302019-04-17T14:22:29+5:30
नॉक नॉक सेलिब्रिटी नाटक करायला मिळणं, हे आपलं टॉनिक आहे, असं क्षितीने म्हटलं आहे.

क्षिती जोगची भागमभाग,‘नॉक नॉक सेलिब्रिटी’नाटक, मालिका आणि चित्रपटामुळे कसरत
कलाकार मंडळी विविध मालिका, चित्रपट, नाटकात काम करण्यात बिझी असतात. विविध माध्यमांमध्ये विविधरंगी भूमिका हे कलाकार साकारत असतात. मात्र एकाचवेळी तिन्ही माध्यमांमध्ये भूमिका साकारण्याचा धोका कलाकार सहसा घेत नाहीत. एकावेळी एकाच प्रोजेक्टवर कलाकारांचा भर असतो. मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा सध्या याला अपवाद आहे. ही अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. सध्या क्षितीचे नवं नाटक रंगभूमीवर आलंय.
'नॉक नॉक' सेलिब्रिटी असं या नाटकाचं नाव आहे. या नाटकात क्षिती आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचा संपूर्ण डोलारा या दोघांवरच आहे. रंगमंचावर सतत वावर असल्याने या कलाकारांची दमछाक तर होणारच. त्यात क्षितीने या नाटकाआधी काही टीव्ही मालिका, काही चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारल्या आहेत. यामुळेच सध्या क्षितीची धावाधाव होत आहे. सकाळ संध्याकाळ मालिकांचे चित्रीकरण, त्यानंतर नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाचे प्रयोग आणि रात्री पुन्हा चित्रपटासाठी शुटिंग अशी कसरत क्षितीला करावी लागत आहे.
इतकी धावाधाव आणि कामाचा ताण असूनही क्षितीच्या कामातील ऊर्जा आणि जोश तसूभरही कमी होत नाही. ती तितक्याच उत्साहाने आणि जोशात प्रत्येक भूमिकेला न्याय देते. “नाटक हे कलाकारांचं टॉनिक असतं, त्यानुसार नाटक दमवत नाही तर तो थकवा दूर करतं. त्यामुळे नॉक नॉक सेलिब्रिटी नाटक करायला मिळणं, हे आपलं टॉनिक आहे, असं क्षितीने म्हटलं आहे.