​कृष्णा बोलणार मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2016 11:08 IST2016-10-14T11:07:08+5:302016-10-14T11:08:46+5:30

मराठी चित्रपटांना मिळणारे यश पाहाता आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, कॉमेडी नाईट्स ...

Krishna speaks in Marathi | ​कृष्णा बोलणार मराठीत

​कृष्णा बोलणार मराठीत

ाठी चित्रपटांना मिळणारे यश पाहाता आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, कॉमेडी नाईट्स बचावो या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कृष्णा अभिषेक हा देखील लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. भिंगरी या चित्रपटाद्वारे तो मराठीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटात कृष्णा अभिषेक सोबत अभिनेत्री कांचन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली ललवाणी यांनी केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. तसेच या चित्रपटाचे काही चित्रीकरण कुलू मनालीला होणार आहे. 

Web Title: Krishna speaks in Marathi