खुशबू तावडेच्या रेट्रो लूकची चाहत्यांना भुरळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:30 IST2019-12-18T06:30:00+5:302019-12-18T06:30:00+5:30

खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी सिनेसृष्टीत नव्हे तर हिंदीमध्ये देखील तितकेच प्रसिध्द आहे.

Khushboo Tawde is Nailing the Retro Look 2019 | खुशबू तावडेच्या रेट्रो लूकची चाहत्यांना भुरळ !

खुशबू तावडेच्या रेट्रो लूकची चाहत्यांना भुरळ !

आजच्या नायिका  सिनेमात विविधरंगी भूमिका साकारतात. काही तरी हटके करण्याकडे अभिनेत्रींचा अधिक कल असतो. मग हा प्रयोग लूकमध्ये असो किंवा भूमिकेतील नाविन्यबाबतचा. गेल्या काही वर्षात तर या अभिनेत्रींचं रेट्रो लूकबाबतचं प्रेम लपून राहिलेलं नाही. अशीच एक अभिनेत्री ज्यांना रेट्रो लूकची भुरळ पडली आहे. ती अभिनेत्री दुसरे तिसरे कोणी नसून ती आहे आहे अभिनेत्री खुशबू तावडे.


खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी सिनेसृष्टीत नव्हे तर हिंदीमध्ये देखील तितकेच प्रसिध्द आहे. नुकतचे तिने सोशल मीडियावर रेट्रो लुकमधले फोटो शेअर केले आहेत . या फोटोंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खुशबूने पोलका डॉटस् घातलेले लाल रंगाच्या शर्ट मधील रेट्रो लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर होताच तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांचे भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

सिनेसृष्टीत काम करता करता कलाकारांची ओळख होऊन ते आयुष्याचे जोडीदार बनल्याची अनेक उदाहरणं आहेत.यांत अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबू तावडेची भर पडली आहे. चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये खूशबु आणि संग्राम एकत्र काम करता करता दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला होता.

खुशबूप्रमाणेच संग्रामदेखील मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. 'देवयानी' या मालिकमुळे संग्राम साळवी घराघघरात पोहचला. 'तू भेटशी नव्याने', 'पारिजात' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'सिंहासन बत्तीसी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिने 'तेरे बीन' या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.
 

Web Title: Khushboo Tawde is Nailing the Retro Look 2019