'खल्लास गर्ल' आता बनणार शिक्षिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 11:22 IST2016-09-23T05:50:17+5:302016-09-23T11:22:17+5:30

'खल्लास' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इशा कोपीकर आता शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करतायेत.लव, ब्रेक-अप आणि ...

'Khallas Girl' will now become a teacher | 'खल्लास गर्ल' आता बनणार शिक्षिका

'खल्लास गर्ल' आता बनणार शिक्षिका

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'खल्लास' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इशा कोपीकर आता शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करतायेत.लव, ब्रेक-अप आणि मैत्री यावर हा 'एफयु' सिनेमा आधारित असेल. या सिनेमात इशा कोपीकरसह महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर आणि सैराट फेम परश्या आकाश ठोसरसुद्धा झळकणार आहे. विशेष म्हणजे  ईशा कोपीकर आणि सत्या मांजरेकर यांच्यावर एक हटके लवस्टोरी सुध्दा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सत्या, आकाश यांच्यासह मयुरेश पेम, शुभम तिरोडियन हे चौघं सिनेमात धम्माल करताना दिसणार आहे. याशिवाय वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु असून 2017 मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: 'Khallas Girl' will now become a teacher