केतकीला आवरला नाही मोह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 16:16 IST2016-09-07T09:48:11+5:302016-09-07T16:16:58+5:30

गायिका म्हटले की, संगीत, वादय हे प्रकार अगदी त्यांच्या मनाच्या कोपºयात वसलेले असतात. गिटार असो या पियानो हे वादय ...

Ketaki is not an idiot | केतकीला आवरला नाही मोह

केतकीला आवरला नाही मोह

यिका म्हटले की, संगीत, वादय हे प्रकार अगदी त्यांच्या मनाच्या कोपºयात वसलेले असतात. गिटार असो या पियानो हे वादय कुठे ही नजरेस पडले की ते वाजविण्याचा मोह कुणाला आवरणार नाही. असेच काहीतरी घडले ते गायिका केतकी माटेगावकर हिच्याबाबतीत. केतकी ही अमेरिका याठिकाणी एका कॉन्सर्ट साठी पोहोचली होती. त्याठिकाणी तिच्या नजरेस एक पियानो पडले. त्या  पियानोवर बसण्याचा मोह केतकीला आवरलेला दिसत नाही. तिने नुकतेच सोशलमीडियावर  पियानो वाजवितानाचा एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर तिने एक स्टेटस देखील अपडेट केले आहे की, संगीत हे मनाला भिडले पाहिजे, त्यासाठी ते व्यक्त करण्याची गरज नसते. केतकीने अपडेट केलेल्या स्टेटसवरून इतकेच लक्षात येते की, तिला पियानो जरी वाजविता येत नसला तरी, तो तिच्या चाहत्यांच्या मनापर्यत नक्कीच पोहोचला असेल. 


Web Title: Ketaki is not an idiot