‘मजाक मजाक मैं’ मराठी कलाकार पोहचले हिंदी शोमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:13 IST2016-08-03T06:43:54+5:302016-08-03T12:13:54+5:30
लाईफ ओके या हिंदी वाहिनीवर २३ जुलैपासून ‘मजाक मजाक मैं’ हा नवीन स्टँडअप कॉमेडी शो सुरु झाला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ...

‘मजाक मजाक मैं’ मराठी कलाकार पोहचले हिंदी शोमध्ये
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">लाईफ ओके या हिंदी वाहिनीवर २३ जुलैपासून ‘मजाक मजाक मैं’ हा नवीन स्टँडअप कॉमेडी शो सुरु झाला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करायला या वाहिनीने या कॉमेडी शोची संकल्पना मांडली आणि आता ख-या अर्थाने हा शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.
‘मजाक मजाक मैं’ या कॉमेडी शोमध्ये आपल्या मराठमोळ्या कलाकारांचा पण सहभाग आहे. अभिनयाने दुस-यांना भावूक करणे हे फार सोपे असते पण समोरच्या व्यक्तीला हसवणे हे फार कठीण असते आणि आपल्या कलाकारांना दुस-यांना हसवायला तसेच त्यांचे मनोरंजन करण्यात नेहमीच यश मिळते.
‘मजाक मजाक मैं’ या शोमध्ये भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, सागर कारंडे, अतुल परचुरे, मेघना एरंडे यांचा मनोरंजक अभिनय पाहायला मिळणार आहे. कॉमेडीची धमाल पाहण्यासाठी शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता लाईफ ओके वाहिनीवर तयार राहा.