"आमच्या काळजाचा तुकडा…", 'झिम्मा २'ची बॉक्स ऑफिसवर ५०व्या दिवशीही यशस्वी घौडदौड, रिंकूची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:57 IST2024-01-12T12:56:56+5:302024-01-12T12:57:27+5:30

Jhimma 2 : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' सिनेमा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणाऱ्या 'झिम्मा २'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला 'झिम्मा २' ५० दिवस उलटूनही चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे.

'Jhimma 2' successful run at the box office even on its 50th day, exclusive post by Rinku Rajguru | "आमच्या काळजाचा तुकडा…", 'झिम्मा २'ची बॉक्स ऑफिसवर ५०व्या दिवशीही यशस्वी घौडदौड, रिंकूची खास पोस्ट

"आमच्या काळजाचा तुकडा…", 'झिम्मा २'ची बॉक्स ऑफिसवर ५०व्या दिवशीही यशस्वी घौडदौड, रिंकूची खास पोस्ट

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' सिनेमा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणाऱ्या 'झिम्मा २'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला 'झिम्मा २' ५० दिवस उलटूनही चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. चित्रपटाचे यश पाहून या चित्रपटात तानियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू भारावली आहे. त्या निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर झिम्मा २चे ५० सुपरहिट डेज असा लिहिलेला फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, झिम्मा हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झाला…त्याचा पुढचा भाग म्हणजे झिम्मा २ तर तुम्ही आधीपेक्षाही जास्त मोठा केलात…तुम्ही त्याचा सोहळा केलात… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने आपला केलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार! झिम्मा २चे ५० दिवस.

हेमंत ढोमे दिग्दर्शित २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या सिनेमाचा 'झिम्मा २' हा सीक्वल आहे. या सिनेमात सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

वर्कफ्रंट...

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘सैराट’ चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपट केले. ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. इतकेच नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केले. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केले.

Web Title: 'Jhimma 2' successful run at the box office even on its 50th day, exclusive post by Rinku Rajguru