'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 21:13 IST2023-11-27T21:12:53+5:302023-11-27T21:13:23+5:30

Jhimma 2 : २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

'Jhimma 2' movie earned so many crores at the box office in 3 days | 'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

'झिम्मा' (Jhimma) चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाचा सीक्वल बनवला आहे. लंडन टूरवर गेलेल्या स्त्रियांच्या गमतीजमती दाखवण्याऐवजी यात त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा लंडनच्या भूमीवर बाईपणाच्या नाना 'तऱ्हा'च पडद्यावर रेखाटल्या आहेत. ‘झिम्मा २’(Jhimma 2)ला सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

२४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे. 

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

Web Title: 'Jhimma 2' movie earned so many crores at the box office in 3 days