जब्याच्या शालूच्या व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत ग्लॅमरस अदा, व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:55 IST2025-06-27T10:54:31+5:302025-06-27T10:55:23+5:30
Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

जब्याच्या शालूच्या व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत ग्लॅमरस अदा, व्हिडीओ चर्चेत
'फॅण्ड्री' (Fandry Movie) फेम शालू उर्फ राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तसेच अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने केलेले वक्तव्यदेखील चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा राजेश्वरी चर्चेत आली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
'फॅण्ड्री' सिनेमातून अभिनेत्री राजेश्वरी खरातने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या सिनेमात तिने साकारलेली शालू रसिकांना खूपच भावली. आजही तिला लोक शालू म्हणून ओळखतात.राजेश्वरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडी नेसली आहे. हातात व्हाइट आणि काळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. गळ्यात सिल्व्हर रंगाचा चोकर नेकलेस आणि कानात मोठे इअररिंग्स घातलेत. कपाळावर काळ्या रंगाची टिकली लावली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. मेरी जान हे गाणं बॅकग्राउंडला ऐकायला असून यात तिच्या ग्लॅमरस अदा पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
राजेश्वरीच्या या लेटेस्ट व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. एका युजरने व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिले की, तुझे सर्व व्हिडीओ छान आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले, आयला काळी चिमणी. तर आणखी एकाने तिला जंगली बिल्ली संबोधले आहे. अनेकांनी सुंदर, झक्कास, कडक आणि खूपच गोड अशा कमेंट्स केल्या आहेत.
वर्कफ्रंट
'फँड्री' चित्रपटानंतर राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघे या चित्रपटात पती पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल त्यांनी सोशल मीडियावर अपडेट दिले होते. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक समजलेले नाही.