सईला 'अंजली' साकारणे वाटले आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 17:17 IST2018-08-22T17:10:23+5:302018-08-22T17:17:02+5:30

लव्ह सोनिया" हा चित्रपट आता भारतात येत्या १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीची सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Its challenging to do anjali role for sai | सईला 'अंजली' साकारणे वाटले आव्हानात्मक

सईला 'अंजली' साकारणे वाटले आव्हानात्मक

ठळक मुद्देसई ताम्हणकर आपल्याला 'लव्ह सोनिया'मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेअंजली साकारणे तिला आव्हानात्मक वाटले

बराच काळ चर्चेत असलेला आणि अनेक आंतराष्ट्रीय चित्रपट संमेलनामध्ये प्रदर्शित झालेला "लव्ह सोनिया" हा चित्रपट आता भारतात येत्या १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीची सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. "लव्ह सोनिया" या चित्रपटाबद्दल सांगताना सई म्हणते, "एखादी भूमिका साकारताना कलाकाराने आपण कसे दिसत आहोत ह्याकडे जास्त लक्ष न देता त्या पलीकडे जाऊन आपण त्या पात्रासाठी काय करू शकतो ह्याकडे जास्त लक्ष केंद्रित करावं जेणेकरून आपण साकारत असलेलं पात्र आणखी सुंदर दिसेल.  'अंजली' हे पात्र माझासाठी खूप चॅलेजिंग होतं कारण 'अंजली' आणि माझ्यामध्ये काहीच साम्य नाही आणि त्यामुळेच हे पात्र साकारणं मला फार आव्हानात्मक वाटलं"

लव्ह सोनिया सिनेमामध्ये राजकुमार राव, रिचा चढ्ढा, सई ताम्हणकर, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलिवूडचे सितारे आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलिवूड अभिनेत्री दिसणार आहेत. लव्ह सोनिया हा दोन बहिणींचा सिनेमा आहे.सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेल्या सोडणाऱ्या बहिणीची गोष्ट आहे.  सई ताम्हणकरच्या लव्ह सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे.

सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 

Web Title: Its challenging to do anjali role for sai