शिल्पा शिंदेचा ऋषि कपूरसोबत आयटम नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:54 IST2016-08-02T09:24:26+5:302016-08-02T14:54:26+5:30

‘भाभीजी घर पर है’ फेम अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदेच्या चाहत्यांना ब-याच दिवसांपासून टेलिव्हिजनवर तिची कमतरता जाणवत आहे. तिच्या ...

Item number with Shilpa Shinde's Rishi Kapoor | शिल्पा शिंदेचा ऋषि कपूरसोबत आयटम नंबर

शिल्पा शिंदेचा ऋषि कपूरसोबत आयटम नंबर

n style="color: rgb(64, 64, 64); font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 17px; line-height: 30px;">‘भाभीजी घर पर है’ फेम अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदेच्या चाहत्यांना ब-याच दिवसांपासून टेलिव्हिजनवर तिची कमतरता जाणवत आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक खूश खबर आहे. एका चित्रपटात ती आयटम नंबर करताना दिसणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचीही भूमिका आहे.  ‘भाभीजी घर पर है’ मालिका मध्येच सोडल्यानंतर शिल्पाला कुठेच काम मिळाले नाही. पण आता ती पुन्हा एकदा पडद्यावर आगमन करण्याच्या तयारीत आहे. ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात ती ऋषी कपूर यांच्यासोबत डान्स करताना दिसेल.

                
शिल्पाने नुकतेच तिचे आवडते अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत गाण्याचे शूटींग पूर्ण केले आहे. हे एक विनोदी गाणे आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य याने केले असून यास बेबी डॉल फेम कनिका कपूरने गायले आहे. चित्रपटात ऋषि कपूर, परेश रावल आणि वीर दास यांच्या भूमिका आहेत. यात ऋषी हे पंजाबी वडिलांच्या तर परेश रावल हे गुजराती वडिलांच्या भूमिकेत दिसतील. हे दोन्ही प्रसिद्ध कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर या चित्रपटाद्वारे एकत्र झळकणार आहेत.
‘भाभी जी घर पर हैं’ मालिका मध्येच सोडल्यानंतर शिल्पा बरीच चर्चेत आली होती. या मालिकेचे निर्माता तिच्या विरुद्ध कोर्टातही गेले होते. शिल्पाने निर्मात्यांवर शोषण केल्याचा आरोप लावला होता. यानंतर तिने एका वेब सिरीजची सुरुवात केली होती. याच्याच प्रमोशनकरिता ती आता विविध शहरांचे दौरे करत आहे.

Web Title: Item number with Shilpa Shinde's Rishi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.