फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट करतोय भूषण प्रधान? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:04 AM2024-01-12T11:04:00+5:302024-01-12T11:06:05+5:30

भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर एकमेकांना करत आहेत डेट? व्हायरल फोटोंमुळे रंगली चर्चा

is bhushan pradhan and anusha dandekar dating actor shared photos with farhan akhtar sister in law | फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट करतोय भूषण प्रधान? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट करतोय भूषण प्रधान? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

मराठी कलाविश्वातील बिनधास्त अभिनेता भूषण प्रधान अनेक तरुणींचा क्रश आहे. दमदार अभिनयाबरोबरच भूषण त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. हँडसम हंक असलेल्या भूषणवर चाहतेही फिदा होता. कमालीचा फिटनेस आणि लूकमुळे भूषण कायमच चर्चेत असतो. पण, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

भूषणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच भूषणच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भूषणने अभिनेत्री अनुषा दांडेकरबरोबरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. अनुषाच्या वाढदिवासानिमित्त भूषणने तिच्याबरोबरचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. भूषणची ही पोस्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या या पोस्टमुळे भूषण आणि अनुषाच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. भूषण आणि अनुषाचे फोटो पाहून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकाने कमेंट करत "तुम्ही डेट करताय का?" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "लग्न करा दोघं" अशी कमेंट केली आहे. 

"तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात", अशी कमेंटही केली आहे. 

"तुम्ही कपल आहात का?" असंही म्हटलं आहे. 

अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलेल्या भूषणचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. आता अनुषाबरोबर त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुषा ही बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची मेहुणी आहे. करण कुंद्राबरोबरच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत होती. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनुषा आणि करणमध्ये काही कारणांमुळे ब्रेकअप झालं होतं. 

Web Title: is bhushan pradhan and anusha dandekar dating actor shared photos with farhan akhtar sister in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.