शानने घेतला या मोहिमेत पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2017 08:44 AM2017-02-09T08:44:41+5:302017-02-09T14:14:41+5:30

 भारतातील युवा पिढीला कर्करोग मुक्त बनविण्याची मोहिम १६ वर्षीय अनुज देसाई याने छेडली आहे. त्याच्या या कॅन्सर फ्री इंडिया ...

Initiative in this campaign took pride | शानने घेतला या मोहिमेत पुढाकार

शानने घेतला या मोहिमेत पुढाकार

googlenewsNext
 
ारतातील युवा पिढीला कर्करोग मुक्त बनविण्याची मोहिम १६ वर्षीय अनुज देसाई याने छेडली आहे. त्याच्या या कॅन्सर फ्री इंडिया २०२० या मोहिमेत गायक शानने देखील पुढाकार घेतला आहे. त्याने नो स्मोकिंग संकल्पनेवर आधारित  गाणं गायलं आहे. याबाबत शान म्हणतो, हे गाणं कुठेतरी माज्या बालपणीची आठवण करून देणारं आहे. धुम्रपानामुळे माझे वडील वेळेआधीच मला सोडून गेले. त्यांचं जाणं हे माज्यासाठी खूपच धक्कादायक होतं. नो स्मोकिंग पापा बीकॉज आय लव्ह यू असं घोषवाक्य असलेल्या या मोहीमेत अनुज देसाई याच्या सोबत त्याचे वडील तुषार देसाई देखील सक्रीय आहेत. आपल्या वडिलांना धूम्रपान करताना पाहून हतबल झालेल्या अनुजने सिगरेट न ओढण्यासाठी केलेली केविलवाणी आर्जव पाहून तुषार यांनी धूम्रपान नेहमीसाठी थांबवलं. आजीसारखे आपले बाबा देखील कर्करोगाने जातील या भीतीने अनुजने त्यांच्याकडे सिगरेट सोडण्याची मागणी केली. आपल्या मुलाला हिरमुसलेला आणि दु:खी पाहून त्यांना जिव्हारी लागलं. आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची टॅग लाईन दिल पे लगेगी तो बात बनेगी या ठिकाणी अगदी तंतोतंत खरी ठरली. आपल्याला आलेला अनुभव तुषार मनापासून सगळ्यांशी शेअर करत असले तरीही या गोष्टीबद्दलची जागरूकता देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. त्यामुळेच अनुजने ही मोहीम मोठ्याप्रमावर राबवायला सुरुवात केली. २०२० पर्यंत भारत धूम्रपान मुक्त करायचा निर्धार त्याने केलाय. परंतु या साठी देशातील युवा पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे असे तो मानतो. म्हणूनच नो स्मोकिंग हा संदेश युवा पिढीच्या समोर नेण्यासाठी त्याने संगीत या माध्यमाचा यशस्वीरीत्या उपयोग केलाय.  अंधेरी येथील रितूंबरा महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या अनुजचं स्वप्न साकारण्यासाठी त्याचे वडील आणि मित्र आप्तेष्ट परिवार त्याला सवोर्तोपरी मदत करत आहे. 

         या मोहिमेबद्दल अनुज म्हणाला, माज्या एका सकारात्मक विचारावर सगळे एकत्र आले आणि प्रत्येक जण मला मदत करतोय. माझे मित्र प्रितेश - मितेश यांनी गाणं संगीतबद्ध केलं. प्रसिद्ध गायक शान यांनी ते गायलं आणि महत्वाचं म्हणजे शानने या कामाचे पैसे न आकारता आपली मदत दिली आहे.  या मोहिमेची दखल प्रशासन देखील घेईल अशी अनुजला खात्री आहे. या गाण्याला शान सोबत व्हॉइस आॅफ इंडिया मधील स्पर्धक प्रियांशी हिची सुद्धा साथ लाभली आहे. लहान मुलांचा निरागस आणि खरेपणाच या मोहिमेचं यश आहे. त्यांना लक्षात ठेऊन हे गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अनुज आणि टीम करीत आहे. या बाबतीत सोशल नेटवर्किंग साईट्स, म्युझिक चॅनेल, थियेटर ट्रेलर चालविण्याच्या प्रयत्नात असल्याचे तुषार देसाई यांनी सांगितले.


 


         






Web Title: Initiative in this campaign took pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.