"३७ वर्षांच्या संसारात मी त्याची फक्त बायको नाही, तर...", अशोक सराफांबद्दल निवेदिता भरभरुन बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 14:05 IST2025-10-11T14:04:24+5:302025-10-11T14:05:13+5:30
Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ५५ वर्षांच्या अभिनय प्रवासातील श्रीनिवास खळे ते बेर्डे-पिळगावकर मैत्रीचे किस्से सांगितले. तसेच यावेळी त्या अशोक सराफ यांच्याबद्दलही भरभरुन बोलल्या.

"३७ वर्षांच्या संसारात मी त्याची फक्त बायको नाही, तर...", अशोक सराफांबद्दल निवेदिता भरभरुन बोलल्या
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहेत. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. नुकतेच निवेदिता सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ५५ वर्षांच्या अभिनय प्रवासातील श्रीनिवास खळे ते बेर्डे-पिळगावकर मैत्रीचे किस्से सांगितले. तसेच यावेळी त्या अशोक सराफ यांच्याबद्दलही भरभरुन बोलल्या.
निवेदिता सराफ अशोक सराफ यांच्याबद्दल म्हणाल्या की, ''आज आमची ३७ वर्षांचा संसार त्याच्या आधीचं एक वर्ष ३८ एक वर्षांचं आमचा सहवास आहे. या इतक्या वर्षांमध्ये मी कधीच अशोकलाना म्हणजे आताही बाहेर काही गॉसिप माहिती असेल मी त्याला सांगितलं तर तो म्हणतो हो माहिती होतं मला. मग मी त्याला म्हणते तू का नाही मला सांगितलंस. तो म्हणतो काय संबंध आहे? मी का दुसऱ्यांच्या गोष्टी येऊन घरी तुला सांगितल्या पाहिजे. आपला आपल्याला काय माहिती काय परिस्थितीत कोणी काय निर्णय घेतला. म्हणजे हे एवढी मोठी गोष्ट त्याच्याकडून मी शिकले आणि त्यांनी कधीच ना त्याने कधी कोणाचा दुस्वास केला नाही. ही केवढी मोठी गोष्ट आहे आज माहिती आहे. म्हणून त्याला श्रीमान योगी म्हणते मी म्हणजे तो ना लोक आपण फिलोसॉफी म्हणतो पण तो जगतो ती फिलोसॉफी. त्यांनी कधीच ना असं वागलं काय त्याला असं झालं पाहिजे तसं असं कधीच मी त्याच्या तोंडून ऐकलं नाहीये. हा त्याच्या स्वभावातला मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे ही.''
त्या पुढे म्हणाल्या की, ''आणि त्याने कायम आणि कायम मला खूप सपोर्ट केलाय. एक पती म्हणून आणि एक मित्र म्हणून आणि काय म्हणूया कुटुंब प्रमुख म्हणून म्हणजे मला जे काही करायचंय आज मला वाटत नाही माझ्या कुठल्याही गोष्टीला अशोकने प्रश्न विचारला नाही. त्यांनी नेहमीच मला ते दिलंय. त्यामुळे माझ्यासाठी ते सर्वकाही आहेत. गुरूपण आणि सगळंच काही. तर सर्वप्रथम मी त्याची सर्वात मोठी फॅन आहे आणि नंतर त्याची बायको आहे.''