"कायम अशी निवांतपणे तुझ्या पाठीशी असेन...", मृण्मयीची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 11:46 IST2024-04-23T11:45:28+5:302024-04-23T11:46:18+5:30

Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडे हिच्या नवऱ्याचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

"I'll be by your side forever...", Mrunmayee Deshpande's special post on her husband's birthday | "कायम अशी निवांतपणे तुझ्या पाठीशी असेन...", मृण्मयीची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

"कायम अशी निवांतपणे तुझ्या पाठीशी असेन...", मृण्मयीची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान आज तिच्या नवऱ्याचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

मृण्मयी देशपांडे हिने तिचा नवरा स्वप्नील राव सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे राव. मी कायम अशी निवांत पणे तुझ्या पाठीशी असेन. आय लव्ह यू. तिच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्नील राव हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने स्वप्निल रावसोबत लग्नगाठ बांधली. ती सध्या तिच्या नवऱ्यासोबत महाबळेश्वरला राहते. हे दोघं तिथे शेती करुन विविध फळं आणि भाज्यांची लागवड करताना दिसतात. मृण्मयी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि बऱ्याचदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील शेअर करताना दिसते. ती पतीसोबतचे रोमाँटिक फोटो ही शेअर करत असते. फोटोंमधून दोघांमधले बॉन्डिंग नेहमी दिसते.

वर्कफ्रंट..

मृण्मयी देशपांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १ मे २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय.

Web Title: "I'll be by your side forever...", Mrunmayee Deshpande's special post on her husband's birthday