"मी फक्त फोटोमध्येच गप्प बसू शकते…", प्रसाद ओकला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:14 PM2024-02-17T12:14:59+5:302024-02-17T12:15:39+5:30

Prasad Oak : प्रसाद ओक आज ४९वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्या निमित्ताने त्याची पत्नी मंजिरी ओक हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

"I can only be silent in the photo...", Prasad Oak's wife wishes him a happy birthday | "मी फक्त फोटोमध्येच गप्प बसू शकते…", प्रसाद ओकला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

"मी फक्त फोटोमध्येच गप्प बसू शकते…", प्रसाद ओकला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

मराठी कलाविश्वातील अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही क्षेत्रात डंका गाजवत आहे. प्रसाद आगामी 'धर्मवीर २' चित्रपटामुळेही चर्चेत आहे. तसेच तो महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परिक्षक आहे. आज त्याचा वाढदिवस असून त्या निमित्ताने त्याची पत्नी मंजिरी ओक हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

मंजिरी ओक हिने इंस्टाग्रामवर प्रसाद ओकसोबतचा फोटो शेअर केला आहे. यात मंजिरीच्या तोंडावर मास्क आहे. तिने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन , गप्प बसेन , तुला बोलू देईन ,मी फक्त ऐकेन. तर जागा हो . फोटो आहे तो, मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते …तुला पर्याय नाही. ओह सॉरी सॉरी आज चांगलं बोलायचं असतं ना ? ओके ओके. आय लव्ह यू. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. हॅप्पी बर्थडे.


मंजिरीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. प्रसादच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये मंजिरीचा मोठा वाटा आहे. मंजिरीने प्रत्येक पावलावर प्रसादची साथ दिली आहे. विशेष म्हणजे आज ती स्वत: कलाविश्वात तिचं स्थान भक्कम करत आहे. प्रसाद ओक सध्या 'धर्मवीर २' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसंच त्याने 'जिलबी' या आणखी एका सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

Web Title: "I can only be silent in the photo...", Prasad Oak's wife wishes him a happy birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.