...त्यांची अर्धांगिनी असल्याचा मला अभिमान : क्रांती रेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2017 01:27 PM2017-07-05T13:27:38+5:302017-07-05T18:58:35+5:30

सतीश डोंगरे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया क्रांती रेडकर हिने गुपचुुप लग्न उरकुण अनेकांना धक्का दिला. जेव्हा तिने ...

I am proud of being their half-way: Revolution Redkar | ...त्यांची अर्धांगिनी असल्याचा मला अभिमान : क्रांती रेडकर

...त्यांची अर्धांगिनी असल्याचा मला अभिमान : क्रांती रेडकर

googlenewsNext
<
strong>सतीश डोंगरे


मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया क्रांती रेडकर हिने गुपचुुप लग्न उरकुण अनेकांना धक्का दिला. जेव्हा तिने तिच्या चाहत्यासाठी फेसबुकद्वारे ही बातमी शेअर केली तेव्हा अनेकांना तिचा जीवनसाथी कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. नंतर त्याचा उलगडाही झाला. क्रांतीने आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांची जीवनसाथी म्हणून निवड केली. सध्या क्रांती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी असून, एका आयपीएस अधिकाºयाची अर्धांगिणी असल्याचा तिला अभिमान वाटतो. क्रांती एका मराठी वाहिणीवरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. या शोनिमित्त तिच्याशी संवाद साधला असता, तिने लग्नानंतरच्या आयुष्यावर विचारलेल्या प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. 

प्रश्न : सनदी अधिकाºयाची पत्नी आणि एक अभिनेत्री या दोन्ही जबाबदाºयांकडे तू कशी बघतेस? 
- या प्रश्नाचे उत्तर देताना मी अगोदरच स्पष्ट करतेय की, ज्या पद्धतीने माझे पती देशसेवेचे कार्य करीत आहेत, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांची प्रतिष्ठा जपताना मी बारिक-सारिक गोष्टींचा विचार करीत असते. मी एका प्रतिष्ठीत व्यक्तीबरोबर आयुष्य व्यतित करीत आहे, याची मी सदैव जाणीव ठेवते. शिवाय त्यांची अर्धांगिणी म्हणून खंबीरपणे त्यांची साथ देतानाही मला गौरवास्पद वाटते. त्यांच्यासोबत आयुष्य व्यतीत करताना मी स्वत:ला भाग्यशाली समजते. एकुणच लग्नानंतरचे आयुष्य खूपच जबाबदारीपुर्ण झाले असून, अभिनेत्री आणि पत्नी म्हणून वावरताना बºयाचशा बारीक-सारिक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. 

प्रश्न : तू एका सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहेस. अभिनेत्री, दिग्दर्शक आणि आता परिक्षक कसा अनुभव सांगशील?
- जेव्हा मला शोच्या निर्मात्यांनी परिक्षक होण्याबाबत विचारले, तेव्हा त्यांनीच काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यांनी मला सांगितले की, तू जशी वागतेस, बोलतेस अगदी तसाच वावर आम्हाला शोमध्ये हवा आहे. तूला कुठल्याही गोष्टींचे परिक्षण करण्याची गरज नाही. कारण संगीताचे परिक्षण करण्यासाठी गायक आदर्श शिंदे तुझ्यासोबत आहेच. माझी जबाबदारी फक्त ऐवढीच की, शोमधील वातावरण कसे  खेळतं ठेवू शकते. स्पर्धकांपैकी होऊन त्यांचे मनोबल कसे वाढविता येईल हाच माझा प्रयत्न असते. वास्तविक आदर्श सूर, ताल आणि लय या मुद्यांद्वारे परीक्षण करीत आहे, तर मी कलाकारांचे सादरीकरण किती मनोरंजनात्मक आहे याचे परीक्षण करीत आहे.

प्रश्न : तू कथ्थक शिकली आहेस, याचा तुला या शोसाठी काही लाभ झाला काय?
- होय, वास्तविक जो व्यक्ती कथ्थक शिकतो, त्याला तालाचा अंदाज चांगला समजतो. कारण कथ्थक हे तबल्याच्या तालावर केले जाते. त्यामुळे एखाद्या स्पर्धकाचे बेताल सादरीकरण झाल्यास ते लगेचच समजून येते. कथ्थक करताना ताल हा पायात बसलेला असतो. त्यामुळे समोरच्याचे सादरीकरण तालबद्ध झाले की, बेताल झाले याची लगेचच हिंट मिळते. आता प्रश्न राहिला सुराचा. तर मला असे वाटते की, सुर बेसूर होत असल्यास साधा व्यक्तीसुद्धा त्याचे सहज परीक्षण करू शकेल. शिवाय माझ्यासोबत आदर्श शिंदे आहेच. स्पर्धकाचे गाणे संपल्यानंतर आदर्श आणि मी चर्चा करीत असतो. त्यामुळे परीक्षकाची भूमिका पार पाडणे सोपे जाते. 

प्रश्न : तू बºयाच काळापासून हिंदी प्रोजेक्टमध्ये झळकली नाहीस, यामागे काही विशेष कारण?
- या प्रश्नाचे उत्तर देताना मी अगोदरच स्पष्ट करते की, मला हिंदी प्रोजेक्टच्या बºयाचशा आॅफर्स येत आहेत. परंतु मी या प्रोजेक्टला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने त्यास नकार दिला आहे. मला नुकतेच ‘बाजीराव पेशवा’ या मालिकेची आॅफर्स आली होती. परंतु मला असे वाटते की, डेली सोपला पुरेसा वेळ देणे मला शक्य नाही. त्यामुळे मी हिंदी टेलिव्हजनपासून काहीसी दूर गेली आहे. चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, मला खूपच निवडक चित्रपटांमध्ये काम करायला आवडते. त्यामुळे माझ्या मनाला आवडेल अशी भूमिका मिळाल्यास नक्कीच मी त्याबाबत विचार करेल. 

प्रश्न : तुझ्या आगामी मराठी प्रोजेक्टविषयी काय सांगशील? 
- ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटात मी अभिनेता मकरंद देशपांडे याच्याबरोबर काम करीत आहे. त्याचबरोबर अभिनेते विक्रम गोखले, उपेंद्र लिमये यांच्याबरोबरही मी ‘बाळा’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे हे तात्पुरते नाव असून, पुढील काळात ते बदलले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सध्या मी रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. 

Web Title: I am proud of being their half-way: Revolution Redkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.