"मी टिपिकल बाईसारखी आहे", स्वयंपाक आणि देवपूजेबद्दल रिंकू राजगुरूने सांगितली खास गोष्ट; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:14 IST2025-10-14T19:13:35+5:302025-10-14T19:14:17+5:30
Rinku Rajguru : नुकत्याच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घरातील कामांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

"मी टिपिकल बाईसारखी आहे", स्वयंपाक आणि देवपूजेबद्दल रिंकू राजगुरूने सांगितली खास गोष्ट; म्हणाली...
'सैराट' (Sairat) चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घरातील कामांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुलाखतीमध्ये रिंकूने स्वतःबद्दल सांगताना म्हटले की, "मी टिपिकल बाईसारखी आहे." घरातील कामे करण्याची तिला विशेष आवड आहे. ती म्हणाली, "माझी देवपूजा मी करते, माझा स्वयंपाक मी करते. मला घर स्वच्छ लागतं." कामाच्या व्यग्रतेमुळे रोज सगळी कामे होत नसली तरी, स्वयंपाक मात्र तिला स्वतःच्या हाताने करायला आवडतो.
रिंकूला आवडत नाही दुसऱ्याच्या हातचा स्वयंपाक
रिंकू पुढे म्हणाली की, "एवढं रोज होत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टींसाठी आपल्याकडे आपल्या ताई येतात कामाला, पण स्वयंपाक नाही मला कोणाच्या हातचा आवडत." तिला बनवता येणाऱ्या पदार्थांविषयी देखील सांगितले. ती म्हणाली, "नॉनव्हेज सोडून सगळंच येतं. मी भाकरी छान करते, पिठलं छान करते. पुरणपोळ्या थोड्या थोड्या जमतात. तर जेवण मला काय सोप्पं आहे. ते काय अवघड नाहीये एवढं." रिंकू राजगुरूचा हा 'टिपिकल भारतीय' अंदाज आणि साधेपणा तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. कामातून वेळ काढून घरची जबाबदारी आणि स्वतःची आवड जपणाऱ्या या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
वर्कफ्रंट
दरम्यान, रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असून ती नवीन प्रोजेक्टसोबत वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असते. सैराटनंतर रिंकू 'कागर', 'झिम्मा २', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमांमध्ये दिसली. तर 'झुंड', '२०० हल्ला हो' या हिंदी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.