विशाल दादलानी यांचे मित्रप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 16:26 IST2016-05-17T10:56:45+5:302016-05-17T16:26:45+5:30

 बॉलीवुडचे तगडे संगीतकार विशाल दादलानी यांनी मराठी इंडस्ट्रीध्ये बालक पालक व टाइमपास या चित्रपटातून आपला सुरेख आवाज मराठी प्रेक्षकांपर्यत ...

Huge Dadl's Friend | विशाल दादलानी यांचे मित्रप्रेम

विशाल दादलानी यांचे मित्रप्रेम

 
ॉलीवुडचे तगडे संगीतकार विशाल दादलानी यांनी मराठी इंडस्ट्रीध्ये बालक पालक व टाइमपास या चित्रपटातून आपला सुरेख आवाज मराठी प्रेक्षकांपर्यत पोहोचविला आहे. आता विशाल दादलानी यांनी मराठीत ही पैसा पैसा या चित्रपटातील रात्र माझी मैत्रीण हे तिसरे गाणे गायले आहे, ते सुद्धा एकही पैसा न घेता. आश्चर्य वाटलं ना? हो. कारण शिवविलाश चौरसिया हे पैसा पैसा या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्याचबरोबर ते रंगभूषाकार म्हणून देखील  बॉलीवुडमध्ये  प्रसिद्ध आहेत. तसेच ते गायक विशाल दादलानी यांचे खाजगी मेकअप आर्टिस्टदेखील आहे. शिवविलाश यांनी त्यांच्या पैसा पैसा या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल कल्पना देताच विशालने मैत्रिपोटी चित्रपटातील एक गाणे कोणताही मोबदला न घेता गाण्याचे वचन दिले आणि पूर्णही केले. इतकंच नव्हे तर हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठीचा सर्व खर्चही त्यांनी स्वत: केला आहे. शिवविलाश चौरसिया यांच्या चहावाला ते मेकअप आर्टीस्ट या खडतर प्रवासाची जाण असल्याने आणि त्यांची कामातील सचोटी तसेच इमानदारी यामुळे ते केवळ खाजगी मेकअप आर्टिस्ट नव्हे तर विशाल दादलानींचे जवळचे मित्र बनले. तसेच पैसा पैसा चित्रपटातील ही रात्र माझी मैत्रीण हे रॉक प्रकारातील गाणे विशाल दादलानी यांनी अफलातून गायले आहे. मुंबईकरांना खुणावणाºया नाईट लाईफवर आधारीत हे गाणे असून अवघ्या चोवीस वर्षांचा रॉकस्टार संगीतकार सोहम पाठक याने या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात अभिनेता सचित पाटील, स्पृहा जोशी, मिलिंद शिंदे आणि आशिष नेवाळकर यांच्या प्रमुख भुमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉजी रेशल जॉब केले असून हा चित्रपट २० मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Huge Dadl's Friend