बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत असा साजरा केला गायक हृषिकेश चुरीने आपला वाढदिवस,पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 10:10 IST2018-05-08T04:40:35+5:302018-05-08T10:10:35+5:30

'सारेगमपा' लिटील चॅम्प्स २०१७ चे ग्रॅंड ज्यूरी आणि प्लेबॅक सिंगर हृषिकेश चुरी ने अनेक ख्यातनाम कलाकारांसोबत अलीकडेच मुंबई मध्ये ...

Hrishikesh Chury celebrates his birthday in the presence of Bollywood | बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत असा साजरा केला गायक हृषिकेश चुरीने आपला वाढदिवस,पाहा फोटो

बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत असा साजरा केला गायक हृषिकेश चुरीने आपला वाढदिवस,पाहा फोटो

'
;सारेगमपा' लिटील चॅम्प्स २०१७ चे ग्रॅंड ज्यूरी आणि प्लेबॅक सिंगर हृषिकेश चुरी ने अनेक ख्यातनाम कलाकारांसोबत अलीकडेच मुंबई मध्ये आपला जन्मदिवस साजरा केला.फिल्म दिग्दर्शक  आणि निर्माता मधुर भांडारकर, योगी एन चंद्रा, संगीत निर्देशक विपिन रेशमिया, मॉंटी शर्मा, गौरव डगावकर, राज आशू गीतकार कुमार राकेश आणि प्रशांत इंगोले तसेच गायक प्रिया सरैया, तरन्नुम मलिक, अरविंदर सिंग, भवदीप आणि सुदीप जयपूरवाले, असित त्रिपाठी, पूर्वा मंत्री, सौरभ जोशी व त्यांची पत्नी पिंकी पूनावाला सुध्हा उपस्थित होते. पद्मविभूषण उस्ताद ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान साहेब ह्यांचा पुरा परिवार, मुर्तुझा मुस्तफ़ा ख़ान, क़ादिर मुस्तफ़ा ख़ान, रब्बानी मुस्तफ़ा ख़ान, नम्रता गुप्ता ख़ान, फ़ैज़ आणि आमिर मुस्तफ़ा ख़ान ह्या सर्वांनी उपस्थित राहून ह्या समारोहाची शोभा वाढविली. हृषिकेश चुरी म्हणाले की, माझा परिवार, परिचित, पूरी सारेगमपा ची टीम, ग्रॅंड ज्यूरीज़ आणि सारे बॉलिवूड स्टार्सचे मी मनापासून आभार मानतो.ज्यांनी माझा हा जन्मदिवस स्पेशल बनवला. या वेळी हृषिकेशने पर्यावरण संरक्षणासाठी,प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग न करण्यास आणि त्याचबरोबर प्लास्टिक निर्मितीचा वापर कमी करण्यास लोकांना आवाहन केले.







अक्षय कुमार, अभिषेक बच्चन,रितेश देशमुख,जॅकलीन फर्नांडिस यांची भूमिका असलेल्या 'हाउसफुल 3' सिनेमाच्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाल होता.सिनेमातील 'टाँग उठा के' हे गाणं यूट्यूब वर हिट ठरलं होतं.या सिनेमातील गायक हृषिकेश चुरीचे हे गाणे अतिशय लोकप्रिय झाल्यामुळे फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर त्याचा प्रचंड चाहतावर्ग वाढला आहे. हृषिकेश चुरी हा मुंबईचा एक प्रशिक्षित गायक आहे. अलीकडेच त्याने झी सारेगमप २०१६ मुंबई ऑडीशन च्यावेळी जज म्हणून काम पाहिले होते.गाण्याला मिळालेल्या प्रचंड यशामुळे त्याने पुढे येऊन, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: Hrishikesh Chury celebrates his birthday in the presence of Bollywood