सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - "त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:30 IST2025-07-10T12:29:23+5:302025-07-10T12:30:01+5:30
Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांचा सेटवरील किस्सा सांगत त्यांच्या दिलदारपणाबद्दल सांगितलं आहे.

सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - "त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे..."
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहेत. बऱ्याच दिवसांपासून सचिन पिळगांवकर यांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. त्यांना त्यावरून ट्रोल केलं जातंय. सचिन यांचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी सचिन पिळगावकर यांचा सेटवरील किस्सा सांगत त्यांच्या दिलदारपणाबद्दल सांगितलं आहे.
जयवंत वाडकर यांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "सचिन पिळगावकर ग्रेट माणूस! मी त्यांना एकदा विचारलं कारण आपल्याकडे च्या शिफ्टला कुठेच नाश्ता नसतो. पण ते मागवतात. त्यावर ते मला म्हणालेले, आपण नऊची शिफ्ट लावतो तेव्हा टेक्निशियन किंवा स्पॉट बॉय वगैरे जे असतात ते किती वाजता वगैरे उठून आलेले असतात. त्यांना आल्यावर काहीतरी खायला किंवा नाश्ता मिळाला पाहिजे. कारण नाश्ता मिळाल्यावर एक प्रकारची एनर्जी येते आणि माणूस आनंदाने काम करतो. मग एक तास जरी उशीरा सोडले तरी ते काहीही बोलत नाही."
''जे ते खातात तेच इतरांनाही देतात''
जयवंत वाडकर पुढे म्हणाले की, "सचिन पिळगावकर यांच्याकडे आणखी एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे जे ते खातात तेच इतरांनाही देतात. सगळ्यांसाठी तेच असतं. इतर ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतं की आर्टिस्टसाठी वेगळं, इतरांसाठी वेगळं, स्पॉटबॉयसाठी वेगळं. पण त्यांचं तसं नसते. सगळ्यांनी मी जे खाईन तेच खायचं. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे असं मला वाटतं."