युट्युब गर्ल मिथिला पालकरचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 17:10 IST2017-06-29T11:40:46+5:302017-06-29T17:10:46+5:30

कप साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह ...

How do you like the mathila palkar's idea of ​​YouTube girl? | युट्युब गर्ल मिथिला पालकरचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला?

युट्युब गर्ल मिथिला पालकरचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला?

साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले. वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. तिच्या टॅलेंटचे कौतुक तर सा-यांनीच केले.हेच कप साँग मिथिलाच्या करिअरसाठी ख-या अर्थाने टर्निंग पाईंट ठरलं. या गाण्यामुळे मिथिला पालकर अल्पवाधीतच लोकप्रिय बनली आणि बघता बघता  या युट्युब गर्लचा एक अभिनेत्री बनण्याचा प्रवास सुरू झाला.मिथिलाची नेटीझन्समध्ये लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती. या लोकप्रियतेमुळेच तिला 'मुरांबा' या मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली,या  सिनेमात अमेय वाघसह मिथिला रूपेरी पडद्यावर झळकली. सिनेमातल्या तिचे भूमिकेचेही विशेष कौतुक झाले.युटुयब गर्लची सिनेमाच्या माध्यमातून नवी इनिंग सुरू झाली. आता ही युट्युब गर्ल एक अभिनेत्री म्हणून स्वत:चे नाव कमावण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसते.विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये मिथिलाची उपस्थिती सा-यांची आकर्षणाच विषय ठरते.एक युट्युबर,अभिनेत्री आणि आता एक स्टायलिश पर्सनालिटी म्हणूनही तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.मिथिलाचा फोटोत दिसणारा प्रत्येक अंदाजाला तरूणाईकडून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळतेय.सोशल मीडियावर नेटीझन्स तिच्या फोटोंना कमेंट आणि लाइक करत असून तिचे विशेष कौतुक करत असतात.या सगळ्या गोष्टींमुळे  सध्या ''आज मै उपर आसमा निचे'' अशीच काहीशी अवस्था मिथिलाची झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुरांबा सिनेमाच्या निमित्ताने अमेय वाघ आणि मिथिला पालकर दोघेही प्रेमात पडल्याच्या वावड्या उठल्या होत्या. शेवटी खुद्द अमेय वाघनेच यांवर स्पष्टीकऱण देत म्हटले होते की, “मी आणि मिथीला एकमेंकांना डेट करत आहोत, मात्र ते एका सिनेमात. आम्ही दोघंही कपल आहोत तेही याच सिनेमात. मात्र मी सिंगल आहे. असं असलं तरी या सिनेमाच्या प्रेमात मी पडलो आहे.” अशी पोस्ट खुद्द अमेयनं टाकली आहे. तो एवढ्यावरच थांबलेला नाही. ज्यांना आपल्या आणि मिथीलाच्या अफेअरच्या बातम्या ख-या वाटल्या. ज्यांना आम्ही चांगले कपल वाटलो त्यांना हा आपला नवा मराठी सिनेमा मुरांबा एक गिफ्ट असल्याचे अमेयनं म्हटले होते. 

Web Title: How do you like the mathila palkar's idea of ​​YouTube girl?