"अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं???", प्रसाद ओकला चाहत्यांनी दिली अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:54 AM2023-10-07T10:54:14+5:302023-10-07T10:54:50+5:30

Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओकने त्याला सेटवर चाहत्यांचा आलेला अनोखा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

"How can such pure, pure, absolute love come to be?", fans gave a unique gift to Prasad Oak. | "अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं???", प्रसाद ओकला चाहत्यांनी दिली अनोखी भेट

"अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं???", प्रसाद ओकला चाहत्यांनी दिली अनोखी भेट

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याची वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. अतिशय कष्टाने प्रसाद ओकने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केले. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता प्रसादने त्याला सेटवर चाहत्यांचा आलेला अनोखा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसाद ओकने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आज अचानक पॅकअपनंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला आणि म्हणाला… “दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत… त्यांना ५ मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव… त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २/३ मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकानी मला फेटा बांधला… दुसऱ्यानी गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्यानी म्हणजे नवनाथ नी… ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली… आणि सगळे जाऊ लागले… मी म्हणालो “ एवढ्याच साठी आला होतात..???” त्यावर ते म्हणाले “ हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..”


प्रसाद ओकने पुढे म्हटले की, आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले…मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं??? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं…??? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे…पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे…अशा वेळी कुठं चुकलो तर??? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो…??? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्ती कडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर” मधले आमच्या
संगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले… संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!

Web Title: "How can such pure, pure, absolute love come to be?", fans gave a unique gift to Prasad Oak.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.