Hotness Alert! अमृता खानविलकर विटेंज लूकमध्ये दिसली खूपच बोल्ड; फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं टेंपरेचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:00 IST2022-02-09T16:59:31+5:302022-02-09T17:00:13+5:30
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने नुकताच विटेंज लूकमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसते आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

Hotness Alert! अमृता खानविलकर विटेंज लूकमध्ये दिसली खूपच बोल्ड; फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं टेंपरेचर
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आगामी प्रोजेक्ट शिवाय ग्लॅमरस आणि हटके लूकमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती तिच्या लूक्ससोबत वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून पाहत असते. दरम्यान तिने नुकताच विटेंज लूकमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसते आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. यात ती शॉर्ट हेअरमध्ये दिसते आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, विटेंज फिल्स. तेजस नेरूरकरसोबत एक्सपेरिमेंट करायला मज्जा येते. तिच्या या फोटोला खूपच पसंती मिळते आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत.
ललित प्रभाकरने अमृता खानविलकरच्या या फोटोवर फायर अशी कमेंट केली आहे. तर श्रेया बुगडेने लिहिले की, कौन हो तुम. तर आदिनाथ कोठारेने म्हटले पिंकीचा विजय असो. शाल्मली खोलगडेने कमेंटमध्ये लिहिले की, फार कमी लोक हा पिंक रंगाचे आउटफिट परिधान करतात. तू केला आहेस. अमृता खूपच हॉट दिसते आहे.
वर्कफ्रंट
अमृता खानविलकर हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. मराठीत फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. तर हिंदीत राझी, मलंग या चित्रपटात अमृताने काम केले आहे.