हॉट आणि बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली श्रुती मराठे, ट्रोलर्स म्हणाले- लस घेतली का मॅडम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 13:14 IST2021-03-08T13:02:29+5:302021-03-08T13:14:55+5:30

श्रुतीने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Hot and bold photos trolled shruti marathe on social media | हॉट आणि बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली श्रुती मराठे, ट्रोलर्स म्हणाले- लस घेतली का मॅडम

हॉट आणि बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली श्रुती मराठे, ट्रोलर्स म्हणाले- लस घेतली का मॅडम

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. श्रुतीने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिला या फोटोंमुळे ट्रोलर्सनी ट्रोल केलं आहे. 


लस घ्यायला ड्रेस, लस घेतली का मॅडम असे प्रश्न कमेंटमधून करुन ट्रोल केलं जातंय. श्रुतीने यावर अद्याप आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही. काहीच दिवसांपूर्वी तेजस्विनी पंडितला देखील इन्स्टाग्रामवर ट्रोल करण्यात आले होते. 


श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 

Web Title: Hot and bold photos trolled shruti marathe on social media