"साडीला सर्फ लावून धुवून टाक", रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स; धुळवडीचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:15 PM2024-03-25T12:15:06+5:302024-03-25T12:16:22+5:30

Holi 2024 : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा होळीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

holi 2024 aishwarya narkar and avinash narkar dance on ritesh genelia deshmukh holi song video | "साडीला सर्फ लावून धुवून टाक", रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स; धुळवडीचा व्हिडिओ व्हायरल

"साडीला सर्फ लावून धुवून टाक", रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स; धुळवडीचा व्हिडिओ व्हायरल

देशात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी साजरी होत आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात होळी सेलिब्रेट करताना दिसतात.  सेलिब्रिटींकडून होळी पार्टीही आयोजित केली जाते. अनेक मराठी सेलिब्रिटीही पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करत धुळवडीचा आनंद घेतात. यात मराठी सिनेसृष्टीतील नारकर कपलही मागे नाही. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या सदाबहार असणाऱ्या जोडीने धुळवड साजरी केली. 

होळीनिमित्त अविनाश-ऐश्वर्या यांनी खास व्हिडिओ बनवला आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर थिरकताना दिसले. 'लय भारी' सिनेमातील "आली होळीच्या दिसाला दुपारला" या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश यांनी डान्स केला आहे. होळीच्या निमित्ताने अविनाश आणि ऐश्वर्या यांनी केलेला हा भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एव्हरग्रीन कपल आहेत. अनेक गाण्यांवर ते रील व्हिडिओ बनवत असतात. डान्सबरोबरच त्यांचे फिटनेसचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. ५०च्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या आणि अविनाश यांचा फिटनेस तरुणांनाही लाजवेल असा आहे. अविनाश-ऐश्वर्या व्हिडिओतून चाहत्यांना फिटनेसचे धडे देण्याबरोबरच अनेकदा फिटनेस चॅलेंजही देताना दिसतात.

Web Title: holi 2024 aishwarya narkar and avinash narkar dance on ritesh genelia deshmukh holi song video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.