"येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली!", हेमंत ढोमेची लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 11:54 IST2023-12-07T11:49:32+5:302023-12-07T11:54:20+5:30

Hemant Dhome And Kshiti Jog : अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री-निर्माती क्षिती जोग मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्या लग्नाला नुकतेच ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Hemant Dhome And Kshiti Jog's 11th Wedding Anniversary, he shared special post on social media | "येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली!", हेमंत ढोमेची लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

"येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली!", हेमंत ढोमेची लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री-निर्माती क्षिती जोग मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. ही जोडी सध्या खूप चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. नुकताच त्यांचा झिम्मा २ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रातले सगळीकडचे शोज हाउसफुल आहेत. दरम्यान, हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे.

हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर क्षिती जोग सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, ११ वर्षांपुर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली! या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली! तुला तर माहितीच आहे क्षिती जोग. आपलं लय खुळ्यागत प्रेम आहे… गाणं पण तेच आहे…(या गाण्यावर पटली राव!) हॅप्पी अॅनिव्हर्सरी.

तर क्षिती जोगने देखील त्याच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, असंच आनंदी सहजीवन एकत्र जगू. लग्नाच्या ११व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हेमंत आणि क्षिती यांच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसोबत चाहते देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

मैत्री मग प्रेम...

हेमंत आणि क्षिती यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीत क्षिती आणि हेमंत यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. 'सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलवेळी त्या दोघांची भेट झाली. त्याआधी हेमंत क्षितीला ओळखत होता. ती त्याच्या एका नाटकाला देखील गेली होते. पण सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलच्या वेळी त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.


 

Web Title: Hemant Dhome And Kshiti Jog's 11th Wedding Anniversary, he shared special post on social media