​के दिल अभी भरा नही नाटकाची पंच्याहत्तरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:53 IST2017-01-22T08:23:19+5:302017-01-22T13:53:19+5:30

मराठी नाटकांना प्रेक्षक जास्त मिळत नसल्याची ओरड अनेकदा केली जात असे. परंतू आता नाट्यविश्वाला देखील सुगीचे दिवस आले असून ...

The heart of the play is not fulfilled yet | ​के दिल अभी भरा नही नाटकाची पंच्याहत्तरी

​के दिल अभी भरा नही नाटकाची पंच्याहत्तरी

ाठी नाटकांना प्रेक्षक जास्त मिळत नसल्याची ओरड अनेकदा केली जात असे. परंतू आता नाट्यविश्वाला देखील सुगीचे दिवस आले असून अनेक नाटकांची शंभरी होताना आपण पाहतो आहे. सिनेमांपेक्षा जास्त प्रेक्षक नाटकाला पसंती देत असल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. मराठी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस नाटके रंगमंच गाजविताना दिसत आहेत. आता हेच पाहा ना लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या भूमिका असलेले , के दिल अभी भरा नही या नाटकाची नुकतीच पंच्याहत्तरी झाली आहे. या नाटकाच्या टिमने त्यांचे यशस्वी पंच्याहत्तर प्रयोग पूर्ण केले आहेत. पती पत्नीच्या नात्यावर भआष्य करणाºया या नाटकाला नाट्यरसिकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. पूर्वी हे नाटक रीमा लागू आणि विक्रम गोखले यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने चांगलेच गाजविले होते. तर सध्या लीना आणि मंगेश यांची अफलातून जोडी हे नाटक यशस्वी करत असल्याचेच पाहायला मिळतेय. त्यामुळे नाट्यरसिकांना आवडत असलेले हे नाटक लवकरच शंभरी करेल यात काही शंकाच नाही.

Web Title: The heart of the play is not fulfilled yet