वैभव मांगले नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचावर कोसळला, व्हिडिओ शेअर करून म्हणाला, आता माझी प्रकृती उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 20:07 IST2019-04-26T20:07:17+5:302019-04-26T20:07:47+5:30

अभिनेता वैभव मांगले याला अलबत्या गलबत्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान चक्कर आली.

Heart attack shock during the play | वैभव मांगले नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचावर कोसळला, व्हिडिओ शेअर करून म्हणाला, आता माझी प्रकृती उत्तम

वैभव मांगले नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचावर कोसळला, व्हिडिओ शेअर करून म्हणाला, आता माझी प्रकृती उत्तम


अभिनेता वैभव मांगले याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे म्हटले जात होते. मात्र अलबत्या गलबत्या या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले रंगमंचावर कोसळला. त्याला चक्कर आल्यामुळे प्रयोग थांबवण्यात आला. याबद्दलचे वृत्त पसरताच अभिनेता वैभव मांगले यांनी आपली प्रकृती उत्तम असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले. एका व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती देत चाहत्यांना दिलासा दिला. मला हृदयविकाराचा झटका आला नसून केवळ थोडासा अशक्तपणा आहे. त्यामुळे चाहत्यांनी निश्चित राहावे, असे मांगले यानी म्हटले आहे.  

सांगली येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात आज संध्याकाळी चार वाजता अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू होता. या नाटकात चेटकीणीची मुख्य भूमिका वैभव मांगले करतो आहे. या नाटकाला खूप गर्दी होती. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले रंगमंचावर कोसळला. थोड्या वेळाने त्याला चक्कर आली असे सांगून या नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला व तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात होते. मात्र वैभव मांगलेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

त्यात त्याने सांगितले की, नाटकाचा प्रयोग विष्णूदास भावे नाट्यगृहात सांगलीत चालू होता. तिथे एसी नाही आणि सांगलीत जवळपास 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. प्रचंड उकाडा आहे. . खूप उकडत होत होते. गुदमरल्यासारखे होत होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. नाटक संपता संपता शेवटच्या दहा मिनिटाला मी कोसळून पडलो. मला हार्ट अटॅक वगैरे आलेला नाही, त्या सगळ्या अफवा आहेत. मी अगदी बरा आहे. खूप घाम आल्यामुळे अशक्तपणा आला आहे. त्यात चेटकिणीचा हेवी गेटअप त्यामुळे मला गरमी सहन नाही झाली. मी बरा आहे. सगळ्यांचा मी आभारी आहे. काळजीपोटी माझी चौकशी केली. सतत तुमच्यासोबत आहे आणि तुमची करमणूक करण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Heart attack shock during the play