"तो स्वतःचीच 'लाल' करतोय असं वाटत असेल, पण...", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर क्रांतीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:16 IST2025-12-24T17:14:27+5:302025-12-24T17:16:21+5:30
Kranti Redkar's reaction to Santosh Juvekar's trolling : 'छावा' या बिग बजेट ऐतिहासिक सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत असताना, दुसरीकडे संतोष जुवेकर त्याच्या काही विधानांमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. आता या ट्रोलिंगवर त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने संताप व्यक्त करत संतोषची बाजू सावरून धरली आहे.

"तो स्वतःचीच 'लाल' करतोय असं वाटत असेल, पण...", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर क्रांतीची प्रतिक्रिया
२०२५ हे वर्ष मराठी अभिनेता संतोष जुवेकरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. 'छावा' या बिग बजेट ऐतिहासिक सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत असताना, दुसरीकडे संतोष जुवेकर त्याच्या काही विधानांमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. आता या ट्रोलिंगवर त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने संताप व्यक्त करत संतोषची बाजू सावरून धरली आहे.
'छावा' सिनेमाच्या प्रसिद्धीदरम्यान संतोषने दिलेल्या काही मुलाखतींमध्ये विक्की कौशलसोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य केले होते. "विक्कीला माझ्याशिवाय चैन पडायची नाही," या त्याच्या विधानाची नेटकऱ्यांनी प्रचंड खिल्ली उडवली होती. यामुळे संतोषला स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः व्हिडीओ देखील शेअर करावा लागला होता. लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने संतोषची पाठराखण केली. ती म्हणाली, "बिचारा संतोष! पण तो स्वभावानंच तसा मजेशीर आणि गोड आहे. तो स्वतःचीच 'लाल' करतोय असं लोकांना वाटत असेल, पण खरं सांगायचं तर तो अतिशय 'ग्राऊंडेड' आणि 'डाऊन टू अर्थ' माणूस आहे."
क्रांती पुढे म्हणाली, "मी संतोषला वैयक्तिकरीत्या ओळखते, त्यामुळे त्याने जेव्हा सांगितलं की विकीला त्याच्याशिवाय चैन पडायची नाही, तेव्हा माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्यांना तो माहिती नाही, त्यांना हे विचित्र वाटू शकतं. पण विकी कौशलने देखील त्यावर सकारात्मक कमेंट केली होती, हे विसरून चालणार नाही."
टीका करणाऱ्यांना दिला सल्ला
ट्रोलर्सना खडेबोल सुनावताना क्रांती रेडकर म्हणाली, "लोक वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत, हे माहिती नसताना त्यांच्यावर कमेंट करू नका. कलाकार जर काही सांगत असेल, तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असते." विशेष म्हणजे 'छावा' रिलीज झाल्यानंतर क्रांतीने व्हिडीओ शेअर करून संतोषच्या कामाचे आणि संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले होते. संतोष जुवेकरच्या 'छावा'मधील भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चा असून हा चित्रपट त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला आहे.