तेजश्री प्रधानच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, ती देखील दिसते खूप सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:00 IST2022-03-11T06:00:00+5:302022-03-11T06:00:00+5:30

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानला थोरली बहिण आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे.

Have you seen Tejashri Pradhan's sister? She is also very beautiful to look at! | तेजश्री प्रधानच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, ती देखील दिसते खूप सुंदर!

तेजश्री प्रधानच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, ती देखील दिसते खूप सुंदर!

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan)ने उमटविला आहे. तेजश्री प्रधानने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि त्यांना तेजश्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तेजश्री प्रधानला सख्खी बहिण आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. नुकतीच तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने तिच्या बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

तेजश्री प्रधानचा जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईत झाला. डोंबिवलीत ती लहानाची मोठी झाली. तिच्या घरी आई वडील आणि एक थोरली बहीण आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव शलाका असून ती एक वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहे.

शलाकाचे लग्न झाले असून ती लग्नानंतर बंगळूरुला स्थायिक झाली आहे. शलाका प्रधानच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वाइल्ड लाइफ फोटो पाहायला मिळत आहेत. शलाकादेखील तेजश्री प्रधानसारखी दिसायला खूप सुंदर आहे. 


तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा जुना फोटो आहे. तिने फोटो शेअर करून लिहिले की, संपन्न आणि शलाका प्रधान मला आठवले की हे पोस्ट करायचे आहे. या पोस्टमध्ये तेजश्रीने म्हटले की, जर तुम्हाला निसर्गाचे छान फोटो पाहायचे असतील तर @shalaka_pradhanच्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट द्या. आनंदी जीवन. तेजश्रीच्या या पोस्टला खूप लाइक्स मिळत आहेत. तसेच कमेंट्सचा वर्षावही होताना दिसत आहे.
 

Web Title: Have you seen Tejashri Pradhan's sister? She is also very beautiful to look at!