नेहा पेंडसेचा हा सेक्सी साडी लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 13:00 IST2020-02-05T13:00:00+5:302020-02-05T13:00:00+5:30

साडीत तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले असताना नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर पाहायला मिळत आहे. नेहाचा हा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.

Have you seen this sexy saree look of Neha Pendse? | नेहा पेंडसेचा हा सेक्सी साडी लूक तुम्ही पाहिला का?

नेहा पेंडसेचा हा सेक्सी साडी लूक तुम्ही पाहिला का?

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.  नुकतेच इतर अभिनेत्रींप्रमाणे नेहानेही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटोंनाही रसिकांची कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केला होता. नववधून अंदाजात नेहा खूप सुंदर दिसली. 


नेहा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह कनेक्ट राहण्यासाठी तिच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी ती शेअर करते. याशिवाय तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर  नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. तिचा असाच एक दुसरा फोटोही समोर आला आहे. हा फोटोत नेहाने सुंदर साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. साडीत तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले असताना  नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर पाहायला मिळत आहे. नेहाचा हा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. 

नेहा सध्या एका मराठी चित्रपटात काम करते आहे. त्यामुळे ती खूप बिझी आहे. तिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासोबत तिच्या हनीमून प्लानिंगबद्दल सांगितलं. नेहा म्हणाली की, मराठी चित्रपटानंतर आणखीन एका प्रोजेक्टचे काम सुरू होणार आहे. त्याचे शूटिंग बाकी आहे. काम संपल्यानंतर हनीमूनला जाणार आहे. हनीमूनसाठी जापानची निवड केली आहे. कामामुळे एप्रिलमध्ये बाहेर जाणार आहे.

Web Title: Have you seen this sexy saree look of Neha Pendse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.