रमेश देव यांच्या थोरल्या सूनेला पाहिलंत का?, आहे खूप लोकप्रिय आणि दिसते खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 06:00 IST2022-02-24T06:00:00+5:302022-02-24T06:00:00+5:30

अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) आणि सीमा देव (Seema Deo) यांच्या सुनेला बऱ्याचदा तुम्ही पाहिलेही असेल.

Have you seen Ramesh Deo's eldest daughter-in-law? She is very popular and looks very beautiful! | रमेश देव यांच्या थोरल्या सूनेला पाहिलंत का?, आहे खूप लोकप्रिय आणि दिसते खूपच सुंदर!

रमेश देव यांच्या थोरल्या सूनेला पाहिलंत का?, आहे खूप लोकप्रिय आणि दिसते खूपच सुंदर!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांची पत्नी सीमा देव यादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर त्यांची दोन्ही मुले म्हणजेच अजिंक्य देव आणि अभिनय देव यांचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. अजिंक्य प्रसिद्ध अभिनेता आहे तर अभिनय प्रसिद्ध दिग्दर्शक. रमेश देव आणि सीमा देव यांच्या सुनेबद्दल फारशी कोणाला माहित नाही. तुम्ही तिला अनेकदा पाहिले देखील असेल पण तुमच्या लक्षात आले नसावं की त्या यांच्या सून आहेत.

दिग्दर्शक अभिनय देव यांची पत्नी स्मिता देव यांचे नाव युट्यूब आणि खाद्यपदार्थ, मेजवानी, रेसिपीच्या दुनियेत चर्चेत असते. एका मुलाखतीत रमेश देव यांनी या सुनेचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. 'कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई' या पुस्तकाचं आपल्या सुनेने लेखन केल्याचे सांगितले होते. याशिवाय ती सर्वोत्तम जेवण बनवते अशी प्रशंसा त्यांनी केली होती.


रमेश देव यांची सून स्मिता देव या एक लोकप्रिय लेखिका आणि युट्यूबर आहे. विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींवर आधारित त्यांच्या अनेक व्हिडीओ, पाककृती लोकप्रिय आहेत. 

Web Title: Have you seen Ramesh Deo's eldest daughter-in-law? She is very popular and looks very beautiful!