प्रसाद ओकच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 07:00 IST2022-01-04T07:00:00+5:302022-01-04T07:00:01+5:30

दिग्दर्शक, अभिनेता, गायक, सूत्र दिग्दर्शक आशा वेगवेगळ किंवा व्यक्ती रेखारामधुन प्रसाद ओकने आपली छप सोडली अहे. प्रसाद सध्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtra Chi Hasya Jatra) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय.

Have you seen the photo of Prasad Oak's entire family? It is going viral on social media | प्रसाद ओकच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

प्रसाद ओकच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

आपल्या आवडत्या कलाकारांच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. कलाकारही आपल्या पर्सनल लाईफची माहिती फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतात. मराठी अभिनेता प्रसाद ओक( Prasad Oak) नेही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात प्रसाद त्याची पत्नी मंजिरी आणि दोन मुलं दिसतायेत. प्रसाद ओकच्या मुलांची नाव मयांक आणि सार्थक अशी आहेत. प्रसादच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायेत. प्रसादची पत्नी मंजिरी मुलांसोबतचा फोटो नेहमी शेअर करते असते.  

दिग्दर्शक, अभिनेता, गायक, सूत्र दिग्दर्शक आशा वेगवेगळ किंवा व्यक्ती रेखारामधुन प्रसाद ओकने आपली छप सोडली अहे. प्रसाद सध्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtra Chi Hasya Jatra) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय.

प्रसादची पत्नी  मंजिरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मंजिरी आणि प्रसादचे लव्ह मॅरेज झाले आहे. 1997 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, पार्टीच्या ठिकाणी मंजिरी नेहमीच प्रसादसोबत दिसते.

हिरकणी या सिनेमाची निर्मिती प्रसादने केली होती. आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे. प्रसादच्या संघर्ष काळात ती प्रसादच्या मागे सावली सारखी उभी होती. मंजिरीच्या सांगण्यावरुन प्रसादने कायमस्वरुपी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. प्रसाद आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या या यशात पत्नी मंजिरीचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: Have you seen the photo of Prasad Oak's entire family? It is going viral on social media