पर्ण पेठेचा तो फोटो पुन्हा झाला व्हायरल, निळ्या रंगाच्या साडीत सौंदर्य गेले आणखीन खुलून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:34 IST2020-04-06T14:32:01+5:302020-04-06T14:34:53+5:30
विहीर, रमा माधव, वायझेड, फोटोकॉपी अशा चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे.

पर्ण पेठेचा तो फोटो पुन्हा झाला व्हायरल, निळ्या रंगाच्या साडीत सौंदर्य गेले आणखीन खुलून
अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना तिने घायाळ केलं होतं.
तिच्या प्रत्येक अंदाजावर तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर सध्या ती प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच तिचे हे साडीतील फोटोंने देखील रसिकांची भरभरून पसंती मिळवली आहे. विहीर, रमा माधव, वायझेड, फोटोकॉपी अशा चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे.
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो पर्ण पेठे सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. काही दिवसांपूर्वी पर्णने एक फोटोशूट केले आहे. हेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यांत तिने निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे. यामध्ये पर्ण पेठेचा लूक तितकाच घायाळ करणारा असाच आहे.