'दुनियादारी' फेम दिग्दर्शक संजय जाधवच्या लेकीचा डान्स पाहिलात का?, व्हिडीओ होतात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 13:16 IST2021-09-14T13:15:49+5:302021-09-14T13:16:15+5:30

संजय जाधवची लेक लाइमलाइटपासून राहते दूर

Have you seen 'Duniyadari' fame director Sanjay Jadhav's daughter dance ?, videos go viral | 'दुनियादारी' फेम दिग्दर्शक संजय जाधवच्या लेकीचा डान्स पाहिलात का?, व्हिडीओ होतात व्हायरल

'दुनियादारी' फेम दिग्दर्शक संजय जाधवच्या लेकीचा डान्स पाहिलात का?, व्हिडीओ होतात व्हायरल

सिनेमॅटोग्राफर ते यशस्वी दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या संजय जाधवने सुरूवातीच्या काळात काही मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. संजय जाधवच्या फॅमिलीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्याची मुलगी उत्तम डान्सर आहे आणि सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

संजय जाधवच्या मुलीचे नाव आहे ध्रिती जाधव. ती चांगली डान्सर आहे. ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. तिने काही व्हिडीओ संजय जाधवसोबतही बनवले आहेत. तिच्या डान्सच्या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते. 


कधी सोलो तर कधी ड्युएट डान्स करतानाचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. तिच्या या व्हिडीओंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो. 

सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधव याने ‘सावरखेड एक गाव’,‘सातच्या आत घरात’,‘डोंबिवली फास्ट’,‘जोगवा’हे मराठी तर ‘मुंबई मेरी जान’,‘सी कंपनी’ या हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर तो मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळले. त्याने ‘चेकमेट’,‘रिंगा रिंगा’हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. मात्र, त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘दुनियादारी’ चित्रपटाला प्रेक्षकांची खूप दाद मिळाली.


‘दुनियादारी’च्या निमित्ताने संजय जाधव हे नाव सिनेइंडस्ट्रीत प्रस्थापित झाले. त्यानंतर संजयने ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘गुरू’, ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

‘दुहेरी’ तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांचीही त्याने निर्मिती केली. तसेच ‘सुर सपाटा’या चित्रपटात त्याने अभिनय केला.

Web Title: Have you seen 'Duniyadari' fame director Sanjay Jadhav's daughter dance ?, videos go viral